पुणे : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक पार पडली. शनिवारी निकालही जाहीर झाला. दोन्ही राज्यांमध्ये महायुतीला बहुमत मिळालं असून सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात महायुतीला २३५ जागा मिळाल्या असून एकट्या भाजपने १३२ जागा मिळवल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या या यशानंतर आता भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाला सुरवात झाली आहे.
देशात सदस्यता मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश मुख्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय, विक्रांत पाटील, माधवी नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. देशात यापूर्वीच सदस्यता अभियानाची सुरुवात झाली होती. पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रात अभियान राबविण्यात आले नव्हते. आता विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ऐतिहासिक सदस्यता नोंदणी करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला आहे.
मिस कॉलद्वारे मिळवा मेंबरशिप तुम्हालाही भाजपचे सदस्यत्व मिळवायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या फोनवरून 8800002024 या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल करावा लागेल. मिस कॉल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर एक मेसेज प्राप्त होईल, ज्यामध्ये सदस्यत्व क्रमांक दिला जाईल.
महत्वाच्या बातम्या-
-‘बारामतीचा एकच दादा’; अजितदादांनी शरद पवारांवर मात करत पुतण्याचा केला पराभव
-‘मी चॅलेंज देतो तू आमदारच कसा होतो तेच बघतो’; अजितदादांनी चॅलेंज पूर्ण केलं?
-‘मिशन पश्चिम महाराष्ट्र पूर्णत्वास’- मुरलीधर मोहोळ
-Kasba Vidhansabha: मित्र आमदार झाला! केंद्रीय मंत्री मोहोळांनी रासनेंना खांद्यावर घेत जल्लोष केला
-पुण्यात महाविकास आघाडीच्या पदरी एकच जागा; कोणाच्या गळ्यात विजयाची माळ? पहा एका क्लिकवर