पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची लगबग सुरु झाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला यश मिळेल असे चित्र असतानाच अनपेक्षित असा निकाल लागला आणि महायुतीला २३५ जागा मिळाल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे नेते अशोक पवार यांना भरसभेत खुलं आव्हान दिलं होतं.
‘तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय?’ अशा शब्दात खुलं आव्हान दिलं होतं. या विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अशोक पवार यांना शिरुरमधून उमेदवारी दिली होती. तर त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ज्ञानेश्वर कटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं होतं. या निवडणुकीत ज्ञानेश्वर कटकेंनी अशोक पवार यांना ७४,५५० मतांच्या फरकाने पराभूत केले. ज्ञानेश्वर कटके यांना १,९२,२८१ इतकी मते मिळाली आहेत. तर अशोक पवारांना १,१७,७३१ इतकी मते मिळाली आहे. त्यामुळे अजित पवारांनी दिलेलं आव्हान पूर्ण केल्याच्या चर्चा आता राज्यभर सुरु आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
“आता अशोक पवार काय म्हणत होते ते मला त्या आमदारानं सांगितलं. त्यानंतर ते (अशोक पवार) तिकडे (शरद पवार गटात) गेले. त्यांना पवार साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तुच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाले. आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय? अजित पवारांनी एकदा मनावर घेतलं तर मी आमदार होऊ देत नाही. आता मी पण चॅलेंज देतो तू आमदारच कसा होतो ते बघतो. मी लोकांना सांगेन की, यांची खरी औकात काय आहे”, असे आव्हान लोकसभा निवडणुकीच्यावेळी अजित पवार यांनी अशोक पवार यांना दिले होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘मिशन पश्चिम महाराष्ट्र पूर्णत्वास’- मुरलीधर मोहोळ
-Kasba Vidhansabha: मित्र आमदार झाला! केंद्रीय मंत्री मोहोळांनी रासनेंना खांद्यावर घेत जल्लोष केला
-पुण्यात महाविकास आघाडीच्या पदरी एकच जागा; कोणाच्या गळ्यात विजयाची माळ? पहा एका क्लिकवर
-चंद्रकांत पाटलांनी कोथरुडचा गड कायम राखला; पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विरोधकांना दाखवलं आसमान
-‘शर्मिला वहिनींचे आरोप धादांत खोटे’; मिडल फिंगर दाखवत अजितदादांनी फेटाळले आरोप