पुणे : पुणे शहरामधील ८ विधानसभा मतदारसंघापैकी महायुतीचा ७ जागांवर दणदणीत विजय झाला आहे. केवळ एकच जागेवर महायुतीला यश मिळवता आलं नाही. महायुतीमध्ये भाजपकडे ६ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे २ जागा होत्या. त्यापैकी भाजपने खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट, कोथरुड, पर्वती, शिवाजीनगर मतदारसंघातून विद्यमान आमदारांना संधी दिली तर कसबा पेठमधून हेमंत रासने यांना संधी दिली. यापैकी भाजपला सर्व जागांवर यश मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस हडपसरमधून चेतन तुपे तर वडगाव शेरीमधून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली होती. या दोन्ही जागांपैकी हडपसरच्या जागेवर राष्ट्रवादीने विजय मिळवला. त्यामुळे महायुतीला ८ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत. तर एक जागा ही महाविकास आघाडीच्या खात्यात गेली आहे.
महाविकास आघाडीला पुणे शहरामधील केवळ एका जागेवर यश मिळाले आहे. वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील टिंगरेंचा पराभव केला आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला होता. त्यापैकीच एक म्हणजे वडगाव शेरीमध्ये अजित पवारांच्या विद्यमान आमदार सुनील टिंगरेंना पोर्शे कार अपघात प्रकरणाचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
१. कसबा
हेमंत रासने (भाजप)
रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
कमल व्यवहारे (अपक्ष)
विजय – हेमंत रासने
२. पुणे कॅन्टोन्मेंट
सुनील कांबळे (भाजप)
रमेश बागवे (काँग्रेस)
विजय- सुनील कांबळे
३. खडकवासला
भीमराव तापकीर (भाजप)
सचिन दोडके (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
मयुरेश वांजळे (मनसे)
विजय- भीमराव तापकीर
४. वडगाव शेरी
बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
विजय – बापूसाहेब पठारे
५. हडपसर
चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
प्रशांत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
साईनाथ बाबर (मनसे)
विजय – चेतन तुपे
६. शिवाजीनगर
सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
दत्ता बहिरट (काँग्रेस)
मनिष आनंद (अपक्ष)
विजय – सिद्धार्थ शिरोळे
७. कोथरूड
चंद्रकांत पाटील(भाजप)
चंद्रकांत मोकाटे(शिवसेना ठाकरे)
किशोर शिंदे (मनसे)
विजय- चंद्रकांत पाटील
८. पर्वती
माधुरी मिसाळ (भाजप)
अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
आबा बागुल (अपक्ष)
विजय- माधुरी मिसाळ