पुणे : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीच्या सुरु असून राज्यात भाजप आघाडीवर असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पुणे शहरातही भाजप आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. शहरातील ८ पैकी ७ जागांवर महायुतीचाच बोलबाला असल्याचे दिसत आहे.
पुण्यात भाजपने ६ जागांपैकी कोथरूड, पर्वती, खडकवासला, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी दिली आणि कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. तर अजित पवारांनी देखील आपल्या दोन विद्यमान आमदारांना वडगाव शेरी आणि हडपसरमधून पुन्हा संधी दिली.
कोथरूड – चंद्रकांत पाटील आघाडीवर
पर्वती – माधुरी मिसाळ आघाडीवर
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर
खडकवासला – सचिन दोडके आघाडीवर
हडपसर – चेतन तुपे आघाडीवर
वडगाव शेरी – सुनील टिंगरे आघाडीवर
कॅन्टोन्मेंट – रमेश बागवे आघाडीवर
पुरंदर विधानसभा – विजय शिवतारे आघाडीवर
पुणे कसबा पेठ – हेमंत रासने आघाडीवर
महायुती या ८ जागांपैकी ७ जागांवर आघाडीवर असून केवळ खडकवासला विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर हे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.