बारामती : राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या बारामती मतदारसंघात आज सकाळपासून चांगलाच गोंंधळ पहायला मिळाला आहे. बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगला आहे. आज युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर आक्रमक होत आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शर्मिला पवारांनी केला आहे. यावरुन बारामतीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. अजित पवारांनी यावर उत्तर दिलं आहे.
शर्मिला पवार यांनी केलेल्या आरोपानंतर आता अजित पवार यांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन भेट दिली. सर्व माहिती घेऊन अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना शर्मिला पवारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
शर्मिला वहिनींनी केलेला आरोप धादांत खोटा आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाच धमक्या दिलेल्या नाही. इतके वर्षे निवडणूक होत आहे. तेव्हापासून असे आरोप झाले नाही. आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. आमचे कार्यकर्ते असं काहीही करणार नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. असे बोलताना अजित पवारांनी मिडल फिंगरही दाखवलं आहे.
अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बोट दाखवून इशारा करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला, असा सवाल पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. यावर अरे वेड्यांनो…तुम्हीच दाखवता मतदान केल्याचं बोट दाखवा…मग मतदान केल्यानंतर शाई लावलेलं बोट दाखवणार ना…दुसऱ्या बोटावर शाई लावली असती असती तर ते दाखवलं…असं म्हणत अजित पवारांनी मिडल फिंगरसह करंगळी दाखवली. यावेळी पत्रकार आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
‘शर्मिला ठाकरेंनी तक्रार केली असेल तर पोलीस याबाबत चौकशी करतील. कुठेही बोगस मतदान झालेलं नाही. मी देखील 50 कार्यकर्त्यांना सांगेल द्या, तक्रारी, पण त्याला काय अर्थ आहे. त्यामागे काहीतरी तथ्य असायला हवं. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटेल त्याला मतदान करा. पण सर्वांनी येऊन मतदान करावं’, असं आवाहन देखील अजित पवारांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यातील ‘या’ मतदारसंघात ७५०० मतदारांची नावं गायब; मतदारांची आक्रमक भूमिका
-Pune Assembly Election: प्रचाराची वेळ संपली तरीही पुण्यात प्रचार सुरुच!
-जरांगेंचा फोटो अन् मराठा उमेदवार ओळखण्याचं आवाहन, कसब्यात लागलेल्या बॅनर्सची शहरात चर्चा