पुणे : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आज सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला आहे. आज राज्यातील मतदार आज आपापल्या मतदारसंघाचा प्रतिनिधीची निवड करणार आहेत. येत्या २३ तारखेला राज्यात कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. राज्यात आज २८८ विधानसभेच्या जागांसाठी मतदान पार पडत आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहेत.
सर्व नेते, कलाकार नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील भोसरी मतदारसंघामध्ये अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भोसरी विधानसभेतील साडे सात हजार मतदारांची नावं अचानकपणे गायब झाली आहेत. त्यानंतर मतदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
आठवड्याभारपूर्वी मतदार यादीत असणारी नावं गायब झाल्याचा आणि हडपसर, बारामती या विधानसभेत नावे टाकल्याचा, दावा मतदारांनी केला आहे. यामागे सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत असल्याचा आरोप या मतदारांकडून करण्यात आला आहे. ही साडे हजार मतं एखाद्या उमेदवाराला विजयी करू शकतात. हे पाहता घडल्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
भोसरी विधानसभेतील साडे सात हजार मतदारांची नावं अचानकपणे गायब झाली आहेत. हा मतांचा आकडा मोठा आहे, त्यामुळे ही नावं कशी गायब झाली याबाबत संशय व्यक्त केले जात आहेत, त्याचबरोबर यामागे सत्ताधाऱ्यांचा हात असल्याचा आरोप देखील आता संतप्त मतदारांकडून केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-Pune Assembly Election: प्रचाराची वेळ संपली तरीही पुण्यात प्रचार सुरुच!
-जरांगेंचा फोटो अन् मराठा उमेदवार ओळखण्याचं आवाहन, कसब्यात लागलेल्या बॅनर्सची शहरात चर्चा
-महायुतीची एकजूट: हेमंत रासनेंना विजयापर्यंत नेणार; महायुतीचे कार्यकर्ते जोमात