पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान उद्या बुधवारी होणार आहे. तर राज्यात कोणाचं सरकार येणार हे येत्या २३ तारखेला जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे. निवडणुका जाहीर होताच राज्यात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. निवडणुकीच्या काळात कोणताही गैरव्यवहार होऊ नये किंवा मतदारांना कोणत्याही प्रकरची प्रलोभनं दाखवली जाऊ नये यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा रोडवरील सहकारनगर पोलीस हद्दीत १३८ कोटी रुपयांचे सोने असणारी गाडी पकडली आहे. त्यातच आता मतदानाच्या आदल्या दिवशी आता प्रेशर कुकरने भरलेला ट्रक अढळला आहे.
अहमदनगर-कल्याण महामार्गावक आणे एसएसटी पथकाने नाकाबंदी दरम्यान पडकलेल्या ट्रकमध्ये तब्बल १३६१ प्रेशर कुकर अढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत असून पुढील तपास केला जात आहे. ट्रक आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ट्रकमधील 1361 प्रेशर कुकर आळेफाटा येथे काही लोकांना दिले जाणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना देण्यासाठी पैसा, दारु, रोकड, भेटवस्तू अशा अनेक गोष्टींची वाहतूक केली जात असल्याचे आढळून येत आहे. जुन्नर भागात एसएसटी पथकाने केलेल्या कारवाईत १३६१ प्रेशर कुकरने भरलेला ट्रक ताब्यात घेतला असून आळेफाटा येथील काही लोकांना दिले जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
-टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा पवारांना जाण्यापासून अडवलं; अजित पवार म्हणाले, ”काकी माझ्या…’
-‘देशात बारामतीची ओळख कोणामुळे हे सगळ्यांना माहितीये’; सांगता सभेतून शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा
-‘पर्वती’चा १५ वर्षात खुंटलेला विकास ५ वर्षात पूर्ण करणार; आबा बागुलांची ग्वाही
-गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवायचं! रासनेंसाठी कसब्यातील मंडळांची वज्रमूठ