बारामती | पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून शेवटच्या तीन दिवसांमध्ये उमेदवारांकडून मतदारसंघ पिंजून काढले जात आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवारांना त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे. युगेंद्र पवारांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संपूर्ण ताकद लावली आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवारांसह त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील मैदानात उतरल्या आहेत. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे.
“तुम्ही मला १९९१ पासून आमदार-खासदार केलं. तेव्हापासून प्रतिभाताई कधी बाहेर आल्या आहेत का? आत्ताच का? काय नातवाचा पुळका आलाय माहिती नाही. जर मी खाताडा, पेताडा, गंजाडी असतो तर गोष्ट वेगळी. मी काकींना एकदा निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे की काय त्या नातवाचा एवढा पुळका आला होता तुम्हाला? पण आत्ता हे विचारण्याची वेळ नाही”, असा मिश्किल टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला आहे.
“मी समोरच्यावर टीका करायला गेलो, तर तो माझा पुतण्या आहेत. मला तो मुलासारखा आहे. पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांवर एकमेकांवर टीका करतोय, असं होईल आणि मला हे सगळं करायचं नाहीये. त्यामुळे भावनिक होऊ नका”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-रिक्षाचालक कुटुंबांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबध्द, हेमंत रासनेंनी केला विश्वास व्यक्त
-‘माझा भाऊ राज्यभर फिरतोय, मग मी कशी घरी बसू?’ बारामतीच्या मैदानात शरद पवारांच्या बहिणीची एन्ट्री
-“कसब्यात राष्ट्रीय खेळाडू घडावे, क्रीडा धोरणाची करणार प्रभावी अंमलबजावणी”- हेमंत रासने