पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे ४ दिवस शिल्लक असून सर्व राजीकीय पक्षांकडून प्रचार सुरु आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात पवार वरुद्ध पवार सामना रंगला असून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार आणि विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत पवार कुटुंब एकवटले असून आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ज्येष्ठ भगिनी सरोज पाटील यांनी बारामतीतील सभेला उपस्थित होत्या.
“माझ्यापेक्षा शरद पवार हा लहान आहे. त्याची तब्येत बरी नसते. तरी तो एवढा फिरतो. त्याचं वाईट वाटतं. मग मी घरी कशी बसू? माझ्यातही ताकद नाही. मी पण कोल्हापुरात फिरते. मला खात्री आहे की, कोल्हापूरमध्ये जयंत पाटील, विश्वजीत कदम, समरजीत घाटगे यांच्यासह सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. मला फक्त हसन मुश्रीफांना पाडायचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत,” असे वक्तव्य भगिनी सरोज पाटील यांनी आज बारामतीत केले आहे.
“भाजप सोडून कुणालाही मतदान करा. हे नालायक लोकं आहेत”, असे म्हणत सरोज पाटील यांनी आज बारामतीची सभा गाजवली आहे. ‘लोकशाही टिकवा, भाजपला चिरडून टाका’, असाही नारा यावेळी सरोज पाटील म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
-“कसब्यात राष्ट्रीय खेळाडू घडावे, क्रीडा धोरणाची करणार प्रभावी अंमलबजावणी”- हेमंत रासने
-‘पर्वती फर्स्ट’मुळे मतदारसंघाचा होणार कायापालट; पर्वतीच्या विकासासाठी आबा बागुलांचं व्हिजन
-इंदापूरात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला; भरणे जागा राखणार की, हर्षवर्धन पाटील गड हिसकावणार?
-बालेकिल्ल्यात दोन्ही राष्ट्रवादीची प्रतिष्ठेची लढाई; पिंपरी विधानसभेवर कोण आपला झेंडा रोवणार?