पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे ६ दिवस बाकी आहेत. अशातच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. वडगाव शेरी मतदारसंघात माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थान असलेल्या मोदी बागेत शरद पवारांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला आहे.
वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना विजयी करण्यामध्ये आमचे मोलाचे योगदान राहिल, असा शब्द त्यांनी पक्षप्रवेशावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिला आहे. वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीपआबा तुपे, सन्मित्र सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल तुपे, धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. तेथील उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचं योगदान राहिल, असा शरद पवार यांना शब्द दिला आहे.
रेखा टिंगरे या वडगाव शेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका होत्या. रेखा टिंगरे यांनी २ वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, शरद पवार आणि वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असल्याचे रेखा टिंगरे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
-“दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा निर्णय घेता आल्याचा आनंद”- चंद्रकांत पाटील
-शरद पवारांची मानसपुत्र वळसे पाटलांच्या मतदारसंघात जंगी सभा; आंबेगावमधून तुफान फटकेबाजी
-मिळकतकरात पुन्हा मिळू लागली ४० टक्के सूट, रासनेंच्या पाठपुराव्याला कसब्याची जनता पोचपावती देणार
-सर्वोच्च न्यायालयाचा शरद पवारांना धक्का; ‘ती’ मागणी मान्य न केल्याने अजितदादांना मिळाला दिलासा
-‘बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय’; अजित पवारांचं प्रचारसभेत वक्तव्य