पुणे : महायुती सरकार दिव्यांगांच्या पाठिशी खंबीर उभी असून शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा पुनरुच्चार कोथरुडचे विद्यमान आमदार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच, दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव समर्पित आहे, अशी देखील चंद्रकांत पाटील यांनी भावना व्यक्त केली आहे.
समुत्कर्ष सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरूडमधील आशिष गार्डन येथे दिव्यांगाचा मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींसोबत मी खूपच जोडला गेलो आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. महायुती सरकार दिव्यांग बांधवांच्या पाठिशी सदैव खंबीरपणे उभे आहे. शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिव्यांगांचा मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यातही दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिन”, अशी ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील दिली आहे.
समुत्कर्ष सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कोथरूडमधील आशिष गार्डन येथे दिव्यांगाचा मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमात ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी समुत्कर्ष सोशल फाउंडेशनचे धनंजय रसाळ, अमोल शिंगारे, सचिन जाधव, भाजप नेते बाळासाहेब टेमकर, सुशील मेंगडे, सुप्रिया माझिरे, विद्या टेमकर, स्वप्नील राजिवडे, कैलास माझिरे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
-शरद पवारांची मानसपुत्र वळसे पाटलांच्या मतदारसंघात जंगी सभा; आंबेगावमधून तुफान फटकेबाजी
-मिळकतकरात पुन्हा मिळू लागली ४० टक्के सूट, रासनेंच्या पाठपुराव्याला कसब्याची जनता पोचपावती देणार
-सर्वोच्च न्यायालयाचा शरद पवारांना धक्का; ‘ती’ मागणी मान्य न केल्याने अजितदादांना मिळाला दिलासा
-‘बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय’; अजित पवारांचं प्रचारसभेत वक्तव्य
-रासनेंच्या विजयासाठी तरुणांची फौज मैदानात; तरुणाईचा भाजपला मिळतोय पाठिंबा