पुणे : आंबेगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाते. दिलीप वळसे पाटील तब्बल ३५ वर्षे आंबेगाव विधानसभेचं नेतृत्व करत आहेत. आज शरद पवार हे आंबेगावमध्ये वळसे पाटलांविरोधात प्रचार सभा घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारसभेमध्ये शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शरद पवार साहेब काय बोलतात, यावर प्रचाराची पुढची रणनीती अवलंबून असेल. असे संकेत वळसे पाटलांनी दिले होते. यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले की, “मी बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. निकालानंतर सत्तेचं समीकरण बदलेल यासाठी मी हे वक्तव्य केलं नव्हतं, तर पुढचे मुख्यमंत्री कोण असतील? याला अनुसरून ते वक्तव्य होतं.”
आज शरद पवारांची आंबेगावमध्ये प्रचारसभा होणार आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “राजकारणामध्ये कधीही परिस्थिती बदलते. लोकशाहीमध्ये एकदा आपण एखादी भूमिका घेतली की, त्या भूमिकेमध्ये जे-जे समोर येईल त्याला सामोरं जावंच लागतं. त्यामुळे पवार साहेबांनी सभा घेतली तर त्याला माझी काही हरकत असण्याचे कारण नाही.” यानंतर आता मानसपुत्राच्या विरोधातच होणाऱ्या सभेचा या निवडणुकीत काय परिणाम होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
-मिळकतकरात पुन्हा मिळू लागली ४० टक्के सूट, रासनेंच्या पाठपुराव्याला कसब्याची जनता पोचपावती देणार
-सर्वोच्च न्यायालयाचा शरद पवारांना धक्का; ‘ती’ मागणी मान्य न केल्याने अजितदादांना मिळाला दिलासा
-‘बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय’; अजित पवारांचं प्रचारसभेत वक्तव्य
-रासनेंच्या विजयासाठी तरुणांची फौज मैदानात; तरुणाईचा भाजपला मिळतोय पाठिंबा