पुणे : शहरातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ असणाऱ्या कसबा मतदारसंघात दीड वर्षांपूर्वी झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. मात्र, आता या परभावानंतर तेव्हाच येणारी विधानसभा निवडणुकीत भाजपने जिंकण्याचा निर्धार केला. हा निर्धार करून भाजप थांबला नाही तर लोकसभा निवडणुकीत कसब्यात आघाडी देखील मिळवून दाखवली आहे.
पोटनिवडणुकीत काँग्रेसकडे गेलेला मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपने आपल्या ताब्यात घेतला तर या लढतीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका भाजपकडील तरुण नेतृत्व बजावणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. पोटनिवडणुकीत झालेला भाजपचा पराभव टिळक-बापट कुटुंबियांच्या देखील मनात नक्कीच सलत होता. म्हणूनच हेमंत रासनेंना यंदा तिकीट मिळाल्यानंतर या कुटुंबातील युवा नेतृत्व पक्ष हित लक्षात घेत प्रचारात सहभागी झाले आहेत.
पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीय काहीसे नाराज असल्याच्या चर्चा होत्या मात्र, आता यावेळी या कुटुंबातील तरुण नेतृत्व सर्व नाराजी विसरून पक्ष शिस्त पाळत भाजपच्या विजयासाठी मोठी मेहनत घेताना दिसत आहे. केवळ टिळकच नव्हे तर बापट कुटुंब देखील कसब्यात पुन्हा एकदा भाजपचा विजय व्हावा, यासाठी मेहनत घेत आहे. स्वरदा बापट, कुणाल टिळक, गौरव बापट यांनी अक्षरशः मतदारसंघ पिंजून काढला आहे. या तीन युवा नेतृत्वाच्या सक्रीय सहभागामुळे कार्यकर्ते देखील चार्ज झाले आहेत. प्रचार फेरी असो, पत्रक वाटप असो छोट्या-मोठ्या सभा असो सर्व प्रकारच्या प्रचारात हे नेते अत्यंत सक्रीय असल्याचे दिसत आहेत.
या तीन नेत्यांसह मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, सम्राट थोरात, योगेश समेळ, राघवेंद्र मानकर, अमित कंक, राजू परदेशी आणि प्रणव गंजीवाले, हे युवा नेतृत्व देखील मोठी मेहनत घेत आहे. हे सर्वजण विधानसभा निवडणुकीत मोठ्या लीडने विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या तरुण नेतृत्वामुळे आता तरुणाई देखील मोठ्याप्रमाणात भाजपकडे वळत आहे. गणेश मंडळांचे तरुण कार्यकर्ते देखील भाजपला पाठींबा देवू लागले आहेत. महत्वाचे म्हणजे या सर्व तरुण नेतृत्वाला अनेक जेष्ठ नेते वेळोवेळी मार्गदर्शन करत असून नवे नेतृत्व या निवडणुकीत उदयाला येत आहे असे दिसत आहे. दरम्यान, या तरुण तगड्या नेतृवाच्या प्रयत्नांना यश किती मिळते हे निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
-पर्वतीत आबा बागुलांची प्रचारात सरशी; घराघरात ‘हिरा’चीच चर्चा
-पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा; शरद पवारांच्या आमदाराचा मोदींना सल्ला
-हिंदुत्व रक्षणासाठी महायुतीचं सरकार आवश्यक, म्हणून…; पतितपावन संघटनेचा महायुतीला पाठिंबा
-पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी संघटनांकडून महत्वाचं पाऊल; पेट्रोलसह काय मिळणार मोफत?