पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. नरेंद्र मोदींच्या वाहनांचा ताफा एफसी रोडमार्गे टिळक रोडमार्गाने एस पी कॉलेजच्या दिशेने जाणार आहे. नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना सल्ला दिला आहे. रोहित पवारांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
“आदरणीय मोदी साहेब, ‘स्मार्ट सिटी’ असलेल्या पुण्याचे रस्ते स्पेस टेक्नॉलॉजीने बनले असून या रस्त्यांवर टँकर क्षणार्धात रस्त्याखाली जातो. त्यामुळे रोड शो दरम्यान काळजी घ्यावी. अकार्यक्षम गृहमंत्र्यांमुळं सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्याचे नव्याने उदयाला आलेल्या ‘बार संस्कृती’मुळे बारा वाजलेत आणि हेच पुणे शहर अंमली पदार्थांचं प्रमुख केंद्र बनलंय. इथंल्या कोयता गँगची तर पोलिसांवरही हल्ला करण्यापर्यंत मजल गेलीय”, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
आदरणीय मोदी साहेब,
‘स्मार्ट सिटी’ असलेल्या पुण्याचे रस्ते स्पेस टेक्नॉलॉजीने बनले असून या रस्त्यांवर टँकर क्षणार्धात रस्त्याखाली जातो. त्यामुळे रोड शो दरम्यान काळजी घ्यावी.
अकार्यक्षम गृहमंत्र्यांमुळं सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्याचे नव्याने उदयाला आलेल्या ‘बार… pic.twitter.com/oWHmlFOOmi— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 12, 2024
“आपण ज्या एफसी रोडवरून जाणार त्याच रस्त्यावर दोन-तीन महिन्यांपूर्वी अंमली पदार्थांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, तेंव्हा सरकारने स्वतःची इमेज जपण्यासाठी अतिक्रमणात असलेल्या ज्या बारवर कारवाई केली, आज त्याच बारवाल्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून आधीपेक्षा मजबूत अतिक्रमण केलं. एवढं होऊनही राज्याच्या अकार्यक्षम गृहमंत्र्यांचं मात्र लक्ष नाही. या बारचे फोटो सोबत पाठवत आहे, महत्वाचं वाटल्यास कारवाई करायचे आदेश द्याल, ही अपेक्षा”, असेही रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-हिंदुत्व रक्षणासाठी महायुतीचं सरकार आवश्यक, म्हणून…; पतितपावन संघटनेचा महायुतीला पाठिंबा
-पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी संघटनांकडून महत्वाचं पाऊल; पेट्रोलसह काय मिळणार मोफत?
-पुणेकरांच्या ‘त्या’ प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनीच काढला तोडगा
-पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर; शहरातील वाहतुकीत मोठे बदल, ‘हे’ असतील पर्यायी मार्ग