पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराच्या माध्यमातून एमेकांवर टीकास्त्र सोडले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात केंद्रस्थानी आहे. कारण लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगत आहेत. मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार आणि त्यांच्ये संख्ये पुतणे युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून जोमाने प्रचार सुरु आहे. मतदारसंघातील एका प्रचार सभेत बोलताना ‘लोकसभा निवडणुकीत जयंत पाटलांच्या भाषेत बोलायचे झाल्यास तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला, असे अजित पवार म्हणाले आहेत.
‘तुमच्या गावात वाद आहेत. तुमच्या गावातील वादाचा फटका मला बसू देऊ नका. तुम्हाला सगळं काही मंळतं. त्यामुळे त्यामुळे तुम्हाला माझी किंमत राहिली नाही. तुम्ही लोकसभेला साहेबांचे (शरद पवार) ऐकले. साहेबांच्या वयाचा विचार करता तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला. आमच्या जयंत पाटलांच्या भाषेत बोलत झालं तर करेक्ट कार्यक्रम केला. आम्ही पण तो स्वीकारला”, असे म्हणत अजित पवारांनी लोकसभेत झालेल्या परभवाची खदखद व्यक्त केली आहे.
“आपल्याच लोकांनी कार्यक्रम केला तर न स्वीकारून कोणाला सांगता? आमच्याच लोकांनी बटणे दाबली. बाहेरून तर कुणी आलं नव्हतं. आम्ही पण ते स्वीकारले”, असे म्हणत कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना “चांगली कामं करा. जर काम खराब झालं, तर मलिदा गँग म्हटलं जातं. त्यातून माझी बदनामी होते. माझ्याकडे बघून निवडणुकीत भाग घ्या. तुमच्याकडे गटबाजी करू नका. गटबाजी करून माझी वाट लावू नका” असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-स्वर्गीय गिरीशभाऊंचा विकासाचा आरसा, कसब्यात हेमंतभाऊंचा तोच वारसा!
-‘चंद्रकांत दादांमुळे मुलींना मोफत शिक्षण’; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांकडून कौतुक
-पर्वती मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात ई लर्निंग स्कूल उभारणार- आबा बागुल
-सुरक्षित पुण्यासाठी महायुतीचं मोठं पाऊल; नव्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी ६० कोटींचा निधी
-Assembly Election: पुण्यात पंतप्रधान मोदींची सभा; ड्रोन, पॅराग्लायडर उडवण्यास बंदी