राजकीय पुढार्यांचा वाढदिवस म्हंटल की मोठमोठे फ्लेक्स आणि कार्यक्रमाचा भपका पाहायला मिळतो. परंतु पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ याला अपवाद ठरले आहेत. मोहोळ यांनी अगदी साधेपणाने आपला वाढदिवस साजरा करत एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करतानाच भेटवस्तू घेण्याचे देखील त्यांनी नाकारले, विद्यार्थ्यांसाठी वह्या आणि ग्रंथ आणण्याचे आव्हान करण्यात आले होते. मोहोळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरभरातील हजारो ग्रंथ आणि शेकडो डझन वह्या भेट करण्यात आल्या आहेत.
मुरलीधर मोहोळ यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे आदित्य दत्ताभाऊ भगत आणि अतिश बाळासाहेब भगत आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून 50 डझन वह्या भेट देण्यात आल्या आहेत. आपल्या नेत्याचा वाढदिवस मोठ्या तामझामात साजरा करण्याची कोणत्याही कार्यकर्त्याची इच्छा असते. मात्र मोहोळ यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्वांनी ग्रंथ आणि वह्या भेट केल्या आहेत.