पुणे: विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी अवघे ८ दिवस उरले असल्याने उमेदवारांकडून नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर देण्यात आला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघ भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आज एआरएआय टेकडीवर जाऊन टेकडीवर येणाऱ्या संवाद साधला. यावेळी त्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी केलेल्या कामांची माहिती नागरिकांना दिली.
“पर्यावरण दिनाव्यतिरिक्त ‘एक पेड मॉं के नाम’ उपक्रमांद्वारे माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पर्यावरण रक्षणासाठी चळवळ उभारली. त्याशिवाय माझ्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ हजार वृक्ष लागवड करुन ती जगवली देखील. पालकमंत्री नात्याने रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली आहे, तरीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेकडीचा मुद्दा काढून संभ्रम निर्माण केला जात आहे” अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, यंदा माझा ६५ वा वाढदिवस संपन्न झाला. त्यामुळे मी कोथरुडसह सर्वत्र ६५ हजार वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संकल्प करुन; तो सत्यात उतरवला. कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर ६५०० वृक्षांची लागवड करुन त्याचे संवर्धन करत आहे. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात बालभारती पौड रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली आहे, अशी भावना व्यक्त केली.