पुणे : राज्यभर विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत्या मंगळवारी (१२ नोव्हेंबर) रोजी पुण्यात सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा, तसेच या दौऱ्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय सुरक्षा दलाचा पथकांचा देखील बंदोबस्त करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी हे पुण्यात लोहगाव विमानतळावर येणार असून त्यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार त्या मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. अशातच सुरक्षेच्या कारणास्तव शहरात ड्रोन कॅमेरे, तसेच पॅराग्लाडरच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहेत.
पॅराग्लायडर, हलकी विमाने (मायक्रो लाइट एअरक्राफ्ट), हाॅट एअर बलूनच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे. संभाव्य घातपाती कारावायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. पंतप्रधान मोदी ज्या मार्गाने जाणार त्या मार्गाचे पाहणी केंद्रीय सुरक्षा पथकाकडून करण्यात येणार आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर शहरातील हाॅटेल, लाॅज, संशयितांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मविआचे उमेदवार अजित गव्हाणेंच्या वक्तव्याने नवा वाद; संतपीठावरील संचालकांचे ‘कॅलिबर’ काय?
-सुनील तटकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन सुळेंचं ओपन चॅलेंज, म्हणाल्या, ‘त्याच्या दोन्ही बाजू फक्त…’
-कसब्यात महायुती एकवटली; जनतेच्या आशीर्वादाने रासनेंचा विजय निश्चित – मानकर
-Kasba Election: गिरीशभाऊंची विकासाची स्वप्ने, पूर्ण करण्याचे वचन हेमंतभाऊंचे!
-पुणे शहर राजस्थानी समाजाचा भाजपाला पाठिंबा; सुनील गहलोत म्हणाले, ‘आम्ही व्यापारी ग्राहकांनाही..’