पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस फुटी आणि अजित पवारांनी शिंदे सेना, भाजपसोबत जात सत्ता स्थापन केल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप झाल्याचे पहायला मिळाले. या घटनेला अनेक महिने लोटले. वर्ष होत आली. मात्र, तरीही यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळांच्या ईडीच्या कारवाईमुळे आम्ही महायुतीसोबत गेल्याचा विषय चांगलाच चर्चेत आला. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांच्या निर्णयाला सहमती दर्शवणारे संकेत शरद पवारांनी दिल्याचं तटकरेंनी सांगितलं आहे. सुनील तटकरेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठा गोप्यस्फोट केला आहे.
“आम्ही जी भूमिका घेतली त्याच्यानंतर सुद्धा एक महिन्यापर्यंत चर्चा झाली. चव्हाण सेंटरला भेटायला गेलो होतो. ती भेट अशीच झाली नव्हती. पावसाळी अधिवेशन सुरू होतं, अधिवेशनाचे शेवटच्या दिवशी सुद्धा घोषणा करण्यात येणार होती. अजित पवारांनी निर्णय घेतलेला आहे. त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांचा विश्वास जास्त होता, ते तसंच होईल. आमच्यापैकी बहुतांश जणांना वाटत होतं, नाही. ते टाईम किलिंग आहे आणि आपल्याला ते राँग बॉक्समध्ये टाकण्यासाठी चालवला आहे. कोणी स्वतःच्या सोयीसाठी आणि राजकारणासाठी अजित पवारांना व्हिलन बनवण्याचा प्रयत्न करू नका” असं सुनील तटकरे म्हणाले आहेत. यावर आता खासदार सुप्रिया सुळेंनी याबाबत आव्हान दिले आहे.
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांना, कोणालाही मी अतिशय विनम्रपणे सांगते. कोणी असे आरोप केले त्याला देखील सांगते हे आरोप एका बाजूने केलेले आहेत, एका बाजूने आरोप करू नका. ते म्हणतील ती वेळ ते म्हणतील तो दिवस, ते म्हणतील तो चैनल किंवा सगळे चैनल कारण, दोन्ही बाजू काय झालं, हे फक्त सुप्रिया सुळेला माहिती आहे. कारण दोन्ही बाजूनी मी सर्वांना बोलत होते”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-कसब्यात महायुती एकवटली; जनतेच्या आशीर्वादाने रासनेंचा विजय निश्चित – मानकर
-Kasba Election: गिरीशभाऊंची विकासाची स्वप्ने, पूर्ण करण्याचे वचन हेमंतभाऊंचे!
-पुणे शहर राजस्थानी समाजाचा भाजपाला पाठिंबा; सुनील गहलोत म्हणाले, ‘आम्ही व्यापारी ग्राहकांनाही..’
-महाविकास आघाडीच्या ‘त्या’ जाहिरातीतून अजितदादांची बदनामी; राष्ट्रवादीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
-काँग्रेसच्या कारवाईनंतर कमल व्यवहारे आक्रमक; म्हणाल्या, ‘राजीनामा दिला तरीही…’