पुणे : कसबा विधानसभा मतदार संघाच्या प्रचंड विकासाचे स्वप्न दिवंगत आमदार गिरीश बापट यांनी पाहिले. ही सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचे आश्वासन आणि वचन कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांनी दिले आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजप आणि महायुतीचे उमेदवार म्हणून हेमंत रासने हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या सर्व ठिकाणी पदयात्रा निघत असून ज्येष्ठ, बुजूर्ग आणि प्रख्यात व्यक्तिमत्त्वांना घरोघरी जाऊन ते भेटत आहेत.
या गाठीभेटींमध्ये विकसित आणि सुरक्षित कसबा मतदार संघाबाबतचा दृष्टिकोन हेमंत रासने यांनी नमूद करीत आहेत. दिवंगत गिरीश बापट आणि दिवंगत मुक्ता टिळक यांचा विकास कामाचा वारसा आपण असाच पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन हेमंत देत आहेत, आणि ते मतदारांना भावतही आहे.
गिरीश बापट हे 1995 मध्ये निवडून आल्यानंतर या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न होते आणि अशा नागरी समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला. नागरिकांच्या समस्या या छोट्या-छोट्या होत्या. मात्र त्या सोडवणे अत्यंत आवश्यक होते. त्यामध्ये प्रामुख्याने या मतदारसंघात अनेक जुने वाडे होते, त्यांच्या पुनर्विकासासाठी अनेक महत्त्वाचे अडथळे होते. त्याचप्रमाणे, मतदारसंघातील अन्य समस्या म्हणजे ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, शौचालये, रस्ते यावरही गिरीशभाऊंनी भर दिला होता. त्यातील प्रलंबित प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याची ग्वाही हेमंतभाऊ यांनी दिली आहे,
त्यानंतर या समस्यांच्या सोडवण्यासाठी गिरीश बापट यांच्याबरोबरच भाजपनेही मोठे प्रयत्न केले. दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा या समस्या सोडवण्याने नागरिकांची जीवन आता सुसह्य आणि सुखकर झाले आहे. समस्या सोडवण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात येत असताना या मतदारसंघात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची समस्या सुद्धा मोठी होती आणि ती लक्षात घेऊन खासगी जागेत आरोग्य विषयक कामे करण्यासाठी गिरीश बापट यांनी 2003 मध्ये सरकारकडून निधी मिळवला. पण, त्याला सध्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यावर स्थगिती आली. एवढेच काय, ती कामे तशीच दोन वर्षे कायम राहिली.
वाड्यात बाथरूम तयार करणे, बाथरूमची दरवाजा व्यवस्था दुरुस्ती, ड्रेनेज लाईन तयार करणे यासाठी हा निधी वापरला गेला. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य अधिक सुखकर आणि सुसह्य झाले. कसबा पेठ मतदार संघातील वाडे आणि त्यातील रहिवासी यांचे प्रश्न सुटत चालले असल्यामुळे सर्वत्र भारतीय जनता पार्टीला आणि तिच्या प्रतिनिधींना या मतदारसंघात मानाचे स्थान दिले गेले आहे. त्यातच आता प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन हेमंत रासनेंनी दिल्यामुळे नागरिक भाजपला कौल देण्याच्या मन:स्थितीत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे शहर राजस्थानी समाजाचा भाजपाला पाठिंबा; सुनील गहलोत म्हणाले, ‘आम्ही व्यापारी ग्राहकांनाही..’
-महाविकास आघाडीच्या ‘त्या’ जाहिरातीतून अजितदादांची बदनामी; राष्ट्रवादीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
-काँग्रेसच्या कारवाईनंतर कमल व्यवहारे आक्रमक; म्हणाल्या, ‘राजीनामा दिला तरीही…’
-“कसब्याच्या जनतेने नेहमीच भाजपला साथ दिली, यंदाही जनता आमच्यासोबत”, सी. टी. रविंचा विश्वास
-एकीकडे मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे, पुण्यात प्रचारसभांचा धुराळा