पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. पुण्यातील सर्व मतदारसंघातही आमचाच पक्ष विजयी होईल. त्यातही कसब्यातील जनतेने नेहमीच भाजपला साथ दिली असून यंदाही जनता आमच्याच सोबत असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी. टी. रवि यांनी व्यक्त केला. कसबा मतदारसंघात गुरुवारी महायुतीची महाबैठक पार पडली.
“कसबा पेठेत भाजपचीच सत्ता राहिली आहे. पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसकडे गेली. परंतु लोकसभेला पुन्हा एकदा भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत कसबा भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे मला विश्वास आहे यंदा येथून महायुतीचे उमेदवार हेमंत रासनेच निवडून येतील. कसब्याप्रमाणे पुण्यातील महायुतीच्या आठही जागा आम्ही जिंकू”, अशी प्रतिक्रिया सी. टी. रवि यांनी दिली आहे.
यावेळी भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपल्या विजयाचा दावा सांगितला. प्रसारमाध्यमांशी बोलताना हेमंत रासने म्हणाले की, “आम्ही येथे महायुतीच्या महाबैठकीचे आयोजन केले होते. परंतु कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांच्या भरघोस प्रतिसादामुळे या बैठकीला मेळाव्याचे रूप आले. सर्वांनी या मेळाव्यात जो विश्वास व्यक्त केला. त्यानंतर लोकसभेप्रमाणेच विधानसभेला आम्ही मोठे मताधिक्य मिळवू. गेले १८ महिने या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरिता ज्या पद्धतीची मेहनत आम्ही घेतली, त्यानंतर कसब्यातील जनता आम्हाला नक्की आशीर्वाद देईल.”
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, महायुतीचा मेळावा म्हणजे हेमंत रासनेंच्या विजयांची नांदी आहे. महायुतीचा उमेदवार कसब्यात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. लाडकी बहिण योजना, युवक-युवतींसाठीच्या योजना, जेष्ठ नागरिकांसाठी केले संकल्प, शेतकऱ्यांसाठी केलेली कामे या सगळ्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचे मताधिक्य वाढण्यात मदत होणार आहे. महायुती सरकारच्या कामाची पावती आम्हाला नक्की मिळेल. राज्यात महायुती सरकारचा मोठा विजय होईल, असा विश्वास यावेळी मानकर यांनी व्यक्त केला.
यावेळी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), राष्ट्रीय समाज पक्ष, लहुजी शक्ती सेना, अखिल भारतीय मराठा महासंघ, युवा स्वाभिमान पक्ष, जनसुराज्य पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), भीमशक्ती, रयत क्रांती संघटना, जनता दल सेक्युलर, लोकजनशक्ती पक्ष,जय मल्हार क्रांती संघटना, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, दलित पँथर, भीमसेना, युवा सुराज्य संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, युनायटेड रिपब्लिकन पार्टी, लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना यासह सर्व मित्र पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-एकीकडे मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे, पुण्यात प्रचारसभांचा धुराळा
-कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना वाढते समर्थन, रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
-सत्ताधारी आमदारांना कळेना नियम, मनमर्जी कारभार; अखेर गुन्हा दाखल
-“राज ठाकरेंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका”; अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला
-“जनतेने दाखवलेला हा विश्वास मी निश्चितच माझ्या कार्यातून सार्थ ठरवीन”- हेमंत रासने