पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांला रंग चढत असून अनेक मतदारसंघात वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारतोफा धडाडत आहेत. अशातच आता पुण्यातील कसबा मतदारसंघातून पक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने ज्येष्ठ नेत्या कमल व्यवहारे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई केली आहे. कलम व्यवहारे यांनी पक्षाचा राजीनामा देऊनही पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केल्यामुळे त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.
“पक्षाचा मी रीतसर राजीनामा दिला आहे, तरीही माझ्यावर का कारवाई करण्यात आली माहीत नाही. कारवाई करणाऱ्याला घटना माहिती नसेल”, अशी टीका कसबा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे यांनी काँग्रेसवर केली आहे. काँग्रेसने बंडखोर उमेदवारांवर 6 वर्ष निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर त्या आक्रमक झाल्या आहेत.
पुण्यातील कसबा, पर्वती मतदारसंघातून काँग्रेस नेत्यांकडून बंडखोरी झाल्याचे पहायला मिळाले आहे. अशातच काँग्रेस पक्षाकडून झालेल्या कारवाईवरुन नेते नाराज आहेत. मात्र, तरीही मतदारसंघातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“कसब्याच्या जनतेने नेहमीच भाजपला साथ दिली, यंदाही जनता आमच्यासोबत”, सी. टी. रविंचा विश्वास
-एकीकडे मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे, पुण्यात प्रचारसभांचा धुराळा
-कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना वाढते समर्थन, रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
-सत्ताधारी आमदारांना कळेना नियम, मनमर्जी कारभार; अखेर गुन्हा दाखल
-“राज ठाकरेंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका”; अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला