पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अवघे १० दिवसच करता येणार आहे. त्यानंतर प्रचार तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे सर्व पक्षांकडून सुरु असलेल्या प्रचाराला आता रंग चढला आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभांचा धुरळा महाराष्ट्रात उडाला आहे. पुण्यात आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारासाठी दिग्गज नेते मंडळी हजेरी लावणार आहेत.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार करताना दिसणार आहेत. तसेच महाविकास आघाडीसाठी खासदार सुप्रिया सुळे देखील पुण्याच्या रिंगणात उतरल्या आहेत. आज पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.
आज दुपारी १२ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार हे वडगाव शेरी मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ मेळावा होणार आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी अजित पवार मेळावा घेणार आहेत. आज दुपारी बारा वाजता हा मेळावा होणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार सुप्रिया सुळे आज शिवाजीनगर मतदारसंघात बाईक रॅली झाली असून आता प्रचार सभा होणार आहे. आज पुण्यातील अनेक मतदारसंघात आघाडी आणि युतीच्या प्रचार तोफा दणक्यात धडाधडत आहेत. त्यामुळे कोण कोणाला कोणत्या मुद्द्यावरुन टीकेचे लक्ष्य करते हे आजच्या आता प्रचारसभांमध्ये पहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना वाढते समर्थन, रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
-सत्ताधारी आमदारांना कळेना नियम, मनमर्जी कारभार; अखेर गुन्हा दाखल
-“राज ठाकरेंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका”; अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला
-“जनतेने दाखवलेला हा विश्वास मी निश्चितच माझ्या कार्यातून सार्थ ठरवीन”- हेमंत रासने
-अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेवर हर्षवर्धन पाटलांचं सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाले, ‘निकालातून..’