पुणे : भाजप महायुतीचे पुण्यातील कसबा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे. जनतेशी थेट संपर्क असणारा आणि आपला हक्काचा व कामाचा माणूस अशी ओळख असणारे हेमंत रासने यांची प्रभाग क्रमांक २९ मध्ये पदयात्रा पार पडली. यावेळी या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पहायला मिळालं.
दांडेकर पूल येथील श्री सद्गुरू मांगीरबाबा मंदिरात नतमस्तक होऊन या पदयात्रेचा शुभारंभ झाला. माय माऊलीच्या आशीर्वादाने आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने ही पदयात्रा प्रचंड उत्साहात पार पडली. ‘कसब्याच्या प्रगतीसाठी जनतेने भरभरून दिलेल्या आशीर्वादाने माझ्या निर्धाराला नवी ऊर्जा दिली. जनतेचे मला मिळत असेलेले समर्थन हे कसब्यातील जनतेला विकास आणि सकारात्मक राजकारण करणारा लोकप्रतिनिधी हवा हे दर्शवते. जनतेने माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मी निश्चितच माझ्या कार्यातून सार्थ ठरवीन”, असा विश्वास हेमंत रासने यांनी मतदारांना दिला आहे.
या पदयात्रेस शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेना प्रदेश सचिव किरण साळी, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, आरपीआयचे तानाजीराव ताकपेरे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मनीषा बोडके, रमेश काळे, शहर उपाध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, आनंद पाटील, राष्ट्रवादीच्या अर्चना हनमघर, सरचिटणीस चंद्रकांत पोटे, प्रशांत सुर्वे, प्रभाग अध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेवर हर्षवर्धन पाटलांचं सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाले, ‘निकालातून..’
-लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी: १५०० नाही तर आता मिळणार २१०० रुपये
-‘विकास पाहिजे तर आबाच पाहीजे’ म्हणत आबा बागुलांच्या विकास यात्रेने पर्वती दुमदुमली
-‘दस में बस’ला पुणेकरांची पसंती; हेमंत रासनेंचा दावा
-“देवा भाऊ, दाढी भाऊ, जॅकेट भाऊ अन् जाऊ तिकडं खाऊ”; ठाकरेंची तोफ धडाडली