पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांची हजारो महिला व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहभागाने निघालेल्या विकास यात्रेने सर्व पर्वती मतदारसंघ ‘विकास पाहिजे तर आबाच पाहीजे’ अशा घोषणांनी दुमदुमून गेला. त्याआधी आबा बागुल यांनी पर्वती पायथा येथील महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेत, नारळ अर्पण करत पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी हेमंत बागुल, अमित बागुल आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सुरवातीपासून काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या बागुल यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असला तरी, पर्वती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी बागुल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. आबा बागुल यांच्या पदयात्रेची आज सकाळी १० वाजता अप्पर बस डेपो येथून मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांनी हातात बागुल यांचे फोटो व त्यांचे निवडणूक चिन्ह असलेले ‘हिरा’ चे कट आउट घेऊन, आबांच्या विजयाचा जयघोष केला.
“‘आबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’. हिऱ्यासारखे व्यक्तिमत्त्व असलेल्या आबांना हिरा हे निवडणूक चिन्ह मिळाले हे आबांच्या विजयाचे संकेत आहेत. पर्वतीचा विकास हा केवळ आबा बागुल करू शकतात, यावेळी आमच्या श्रावणबाळाला विधानसभेवर पाठविणारच” अशा भावना अनेकांनी या पदयात्रेमध्ये बोलून दाखविल्या आहेत.
पदयात्रेदरम्यान आबा बागुल यांचे जागोजागी औक्षण करून त्यांना ओवाळून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच चौकाचौकात बागुल यांचे परिसरातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी हार, पुष्पगुच्छ देऊन बागुल यांचे स्वागत करीत त्यांना विजयी करून देण्याचा निर्धार व्यक्त केला. फटाक्यांची आतिषबाजी, बँडचा निनाद, हलगीचे वादन व बागुल यांच्या नावाचा जयघोष अशा शाही थाटात ही पदयात्रा पार पडली. पदयात्रेदरम्यान रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी उस्फूर्तपणे बागुल यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“पर्वती विधानसभा मतदारसंघ हा जागृत नागरिकांचा मतदारसंघ असून, येथील विकास गेली १५ वर्षे मागे का पडला? हा प्रश्न सर्वच नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळे हा मागे पडलेला विकास भरून काढण्यासाठी अधिक वेगाने आणि जिद्दीने काम करण्याची गरज आहे. त्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मी ही निवडणूक लढवत असून, भविष्यातील सुखदायी व आनंद देणारा पर्यावरणवादी मतदारसंघ करण्याचा माझा संकल्प आहे. त्यास नागरिकांनी पाठींबा द्यावा”, असे आवाहन आबा बागुल यावेळी आबा बागुलांनी केले आहे. पदयात्रेत पर्वती मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘दस में बस’ला पुणेकरांची पसंती; हेमंत रासनेंचा दावा
-“देवा भाऊ, दाढी भाऊ, जॅकेट भाऊ अन् जाऊ तिकडं खाऊ”; ठाकरेंची तोफ धडाडली
-‘पुढच्या तयारीसाठी सर्वांना संधी द्यावी’; नातवासाठी आजोबांचा मतदारसंघात प्रचारसभांचा धडाका
-चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ गेमचेंजर निर्णयामुळे कोथरुडकरांचा खंबीर पाठिंबा मिळणार!
-काँग्रेस बंडखोरांवर होणार कारवाई? आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्याच्या सूचना