पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूरमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘हे भाऊ बिऊ काही नाहीत जाऊ तिथे खाऊ आहेत.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला आहे.
कोणी काही बोलत नाही. महागाई वाढत चालली आहे. अहो, एक भाऊ आला तर ठीक आहे पण इथे तर तीन तीन भाऊ येतात. देवा भाऊ, एका बाजूला दाढी भाऊ तिसरीकडे जॅकेट भाऊ… दाढी भाऊ तुमचा की, देवा भाऊ तुमचा, की जॅकेट भाऊ? हे भाऊ वगैरे काही नाही जाऊ तिथे खाऊवाले हे भाऊ आहेत”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी तिघांवर निशाणा साधला आहे.
‘लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना विनंती आहे की, पुढील १५ दिवस त्यांनी देशभरातली नेत्यांना घेऊन महाराष्ट्रात राहावे. पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा निघून जावे’, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुढच्या तयारीसाठी सर्वांना संधी द्यावी’; नातवासाठी आजोबांचा मतदारसंघात प्रचारसभांचा धडाका
-चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ गेमचेंजर निर्णयामुळे कोथरुडकरांचा खंबीर पाठिंबा मिळणार!
-काँग्रेस बंडखोरांवर होणार कारवाई? आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्याच्या सूचना
-Assembly Election: ‘पुण्यातील सर्व जागांवर महायुतीच जिंकणार’; पंकजा मुंडेंचा विश्वास
-पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवाराने थेट निवडणूक अधिकाऱ्याची गाडीच पेटवली; धक्कादायक कारण आलं समोर