बारामती | पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच रंग चढू लागला आहे. सत्ताधारी, विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती मतदारसंघात सभांचा धडाका लावला आहे. आज बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामती शिर्सुफळमध्ये सभा घेतली आहे.
“मला चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री केलं. सर्व सत्ता अजित दादांच्या हातात दिली. आता निर्णय तुम्ही घ्यायचे निवडणूका तुम्ही घ्यायच्या. त्यांनी २५-३० वर्षे त्यांनी ते काम केलं. याबाबत माझ्या मनात शंका नाही. पुढची तयारी करायची की नाही? पुढची तयारी करायची असेल तर नेतृत्व हवं आहे. ते तयार करावं लागेल. संधी सर्वांना द्यायची असते, युगेंद्र पवारांना जनतेने निवडून द्यावं”, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे.
“समाजाच्या प्रश्नाचा अभ्यास पाहिजे, कारखानदारीचा अभ्यास पाहिजे. आज एक एमआयडीसी काढली. त्यातून हजारो लोकांना रोजगार मिळाला. याच कामाला गती द्यायची असेल तर जाणकार आणि कष्ट करणारा प्रतिनिधी निवडला पाहिजे म्हणून युगेंद्रची निवड केली.आता काम तुमचं आहे. माझी निवडणूक असो अजित दादांची निवडणूक असो सुप्रियाची निवडणूक असो तुम्ही कधी नाही म्हणाला नाही, मत द्यायला कमी केलं नाही. माझं आग्रहाचं सांगण आहे. तुमच्या गावाचा आजपर्यंतचा जो लौकीक होता. तोच तुम्ही पुढे युगेंद्रच्या बाबतीत कराल. घराघरात चिन्ह पोहचवा मतदान कसं होईल ते पाहा”, असे शरद पवार म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ गेमचेंजर निर्णयामुळे कोथरुडकरांचा खंबीर पाठिंबा मिळणार!
-काँग्रेस बंडखोरांवर होणार कारवाई? आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्याच्या सूचना
-Assembly Election: ‘पुण्यातील सर्व जागांवर महायुतीच जिंकणार’; पंकजा मुंडेंचा विश्वास
-पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवाराने थेट निवडणूक अधिकाऱ्याची गाडीच पेटवली; धक्कादायक कारण आलं समोर
-‘चंद्रकांत पाटलांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला!’ डॉ. माशेलकरांकडून कौतुक