पुणे : विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज राज्यातील अनेक मतदारसंघातून उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. मात्र काही मतदारसंघात बंडखोरी कायम असून बंडखोर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. अशातच, पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील शासकीय कार्यालयात विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दृष्टिहीन उमेदवार विनायक ओव्हाळ यांच्याकडून निवडणूक अधिकारी अनिल पवारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. काळेवाडी पोलिसांनी विनायक ओव्हाळ यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमध्ये अनिल पवार यांच्या खाजगी गाडीचे मागच्या चाकाजवळच्या भागाचे नुकसान झाले आहे. ओव्हाळ यांची नाराजी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी १५ ऑगस्टलाही ओव्हाळ यांनी आयुक्तांची गाडी ही फोडली होती.
ओव्हाळ यांनी गाडी पेटवून देण्याचं पाऊल का उचललं, दोघांमध्ये उमेदवारी अर्जाबाबत काही वाद झाला होता का? याबाबतचा अधिक तपास आता काळेवाडी पोलिसांकडून याबाबत चौकशी करत असताना मिळालेल्या माहितीनुसार, वारंवार पाठपुरावा करून ही रमाई आवास योजनेत घर मिळालं नाही. रसवंती आणि फटाका स्टॉल लावण्यास परवानगी दिली नाही. तसेच पालिकेच्या थेरगाव रुग्णालयात कॅन्टीन लावण्याची परवानगी दिली नाही, या सर्व गोष्टींमुळे संतापलेल्या ओव्हाळ यांनी निवडणूक अधिकाऱ्याची गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘चंद्रकांत पाटलांच्या रुपात कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला!’ डॉ. माशेलकरांकडून कौतुक
-‘कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच’ असं म्हणणाऱ्या नाना काटेंची निवडणुकीतून माघार
-शरद पवारांचा ‘मावळ पॅटर्न’ होणार सक्सेस? राज ठाकरेंचा बापू भेगडेंना पाठिंबा, शेळकेंची डोकेदुखी
-शरद पवारांचा फोन तरीही तोडगा नाहीच, आबा बागुल पर्वतीतून लढणारचं; नेमकं काय घडलं?
-इंदापूरात राजकीय घडामोडींना वेग! शरद पवारांनी घेतली भरत शहांची भेट, प्रवीण माने माघार घेणार?