पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढायला सुरुवात झाली आहे. कोथरुडचे आमदार आणि राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आज चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी चंद्रकांत पाटलांच्या कामाचे माशेलकर यांनी भरभरुन कौतुक केले. तसेच कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला, असे गौरवोद्गार काढले.
चंद्रकांत पाटलांनी आपल्या गत ५ वर्षाच्या कार्याचा कार्य अहवाल डॉ. माशेलकर यांच्याकडे सादर केला. तो त्यांनी सविस्तर पाहिला. पाच वर्षांत केलेल्या कामांची यादी आणि उपक्रम पाहून डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांत पाटलांचे मनापासून कौतुक केल्याचे पहायला मिळाले. यावेळी चंद्रकांत पाटलांच्या कोथरुडमधील आरोग्य विषयक योजनांची डॉक्टरांनी आवर्जून माहिती घेतली.
‘कोथरुड ही राज्याची संस्कृतिक राजधानी आहे. इथे प्रत्येक व्यक्तीची एक वेगळीच ओळख आहे. खरंतर एखादा व्यक्ती विशेष करुन राजकीय व्यक्ती मोठ्या पदावर पोहोचल्यावर त्याच्या स्वभावातही फरक पडतो. विनयशिलता, नम्रपणा कमी होतो. पण चंद्रकांत पाटील यांनी आपल्यालातील विनयशीलता, नम्रपणा आणि समाजाप्रती समर्पित होऊन काम करण्याचा गुण सोडलेला नाही. गेल्या पाच वर्षात चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून कोथरुडकरांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने कोथरुडकरांना माणसं जोडणारा हिरा गवसला आहे’, असे डॉ. माशेलर यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, चंद्रकांतदादा पाटील यांनीही कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, यावेळी डॉ. माशेलकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या गुरु पौर्णिमेनिमित्तच्या गुरुपूजन उपक्रमाचेही भरभरुन कौतुक केले. तसेच, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे हे देखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच’ असं म्हणणाऱ्या नाना काटेंची निवडणुकीतून माघार
-शरद पवारांचा ‘मावळ पॅटर्न’ होणार सक्सेस? राज ठाकरेंचा बापू भेगडेंना पाठिंबा, शेळकेंची डोकेदुखी
-शरद पवारांचा फोन तरीही तोडगा नाहीच, आबा बागुल पर्वतीतून लढणारचं; नेमकं काय घडलं?
-इंदापूरात राजकीय घडामोडींना वेग! शरद पवारांनी घेतली भरत शहांची भेट, प्रवीण माने माघार घेणार?
-Assembly Election: बंडखोर झाले नॉटरिचेबल; कसब्यात धंगेकरांची धाकधूक वाढली