पुणे : विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्ज मागे घेण्याचे शेवटचे काही तासच उरले आहेत. अशातच चिंचवडमधील बंडखोर उमेदवार नाना काटे यांनी नवा राजकीय डाव टाकला आहे. बंडखोरांना शांत करण्याचा शेवटचा प्रयत्न दिग्गज नेते मंडळींकडून होत आहे. त्यातच, मावळ पॅटर्नला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पाठिंबा दर्शवला आहे.
मावळ पॅटर्न सत्यात उतरवण्यासाठी भाजप नेते बाळा भेगडे यांची राज ठाकरेंनी भेट घेतली आहे. बापू भेगडेंसाठी बाळा भेगडेंनी सुनील शेळकेंच्या विरोधात रान उठवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांचे शिलेदार सुनील शेळकेंचा पराभव करण्यासाठी सर्वपक्षीयांनी बापू भेगडेंना पाठिंबा दिला आहे. सर्व पक्षांचा पाठिंबा मिळालेल्या बाळा भेगडेंचं सुनील शेळकेंना मोठं आव्हान आहे.
बापू भेगडेंना मावळ भाजपने आधीचं पाठिंबा जाहीर केला आहे. महाविकास आघाडीमध्ये मावळची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे असताना देखील शरद पवारांनी उमेदवार न देता शेळकेंच्या पराभवासाठी मोठा डाव टाकला आहे. उमेदवार न देता शरद पवारांनी बापू भेगडेंना पाठिंबा दिला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते आता बापू भेगडेंच्या प्रचारामध्ये सक्रिय झाले आहेत. तर सुनील शेळकेंना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना देखील भेगडेंच्या पाठिशी आहेत. अजितदादांच्या शिलेदाराला कोंडीत पकडण्यासाठी तयार झालेला ‘मावळ पॅटर्न’ चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच, आता एकीकडे सर्व पक्षीयांचा पाठिंबा असणारे बापू भेगडे अन् दुसरीकडे अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळके या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या-
-इंदापूरात राजकीय घडामोडींना वेग! शरद पवारांनी घेतली भरत शहांची भेट, प्रवीण माने माघार घेणार?
-Assembly Election: बंडखोर झाले नॉटरिचेबल; कसब्यात धंगेकरांची धाकधूक वाढली
-‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ आबा बागुलांच्या समर्थनार्थ मतदारसंघात बॅनरबाजी
-नाना काटेंचं बंड शमवण्यासाठी अजित पवारांकडून शर्तीचे प्रयत्न; नाना काटे माघार घेणार का?
-“…त्याला उमेदवारी देताना स्वाभिमान कुठं ठेवला?”; विजय शिवतारेंचा अजितदादांना सवाल