पुणे : पुरंदर विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात उतरलेल्या विजय शिवतारे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी झेंडे यांनी शड्डू ठोकला आहे. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात रान उठवलं होतं. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात निवडणुकीची तयारी केली होती मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांनंतर शिवतारेंनी निर्णय मागे घेत सुनेत्रा पवारांना निवडणुकीत मदत देखील केली होती. आता याचाच राग धरुन अजित पवारांनी पुरंदर विधानसभेत शिवतारेंविरोधात आपल्या शिलेदाराला मैदानात उतरवलं असल्याचं दिसत आहे. या संपूर्ण परिस्थितीवर आता विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मी बारामती लोकसभेतून माघार घेतली होती तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिन्ही नेत्यांसमोर शब्द दिला होता की, पुरंदरचा किल्लेदार विधानसभामध्ये पाठवा. तरी देखील संभाजी झेंडेंची उमेदवारी का जाहीर केली? निष्ठावान राष्ट्रवादीच्या नेत्याला संधी दिली असती तरी मला चालले असते. पण ज्यांनी सुनेत्रा पवारांना पडण्यासाठी ज्याने प्रयत्न केला त्याला उमेदवारी देताना स्वाभिमान कुठं ठेवला?” असा सवाल विजय शिवतारे यांनी अजित पवारांना विचारला आहे.
“लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात ज्याने सुनेत्रा पवारांना पडण्याचा प्रयत्न केला त्याला अजितदादांनी तिकीट दिले, याबाबत मला आश्चर्य वाटते. पुरंदर हवेली मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर संभाजी झेंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संभाजी झेंडे यांनी सुनेत्रा पवारांना पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली त्यांना उमेदवारी दिली ही वैचारिक दिवाळखोरी आहे”, असेही शिवतारे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभेला रान उठवलं, पण आता अजितदादा घेणार बदला? पुरंदरच्या मैदानात शिवतारेंविरोधात उतरवला उमेदवार
-निवडणुकीच्या धामधुमीतही जपली परंपरा; आबा बागुलांकडून रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलांना अभ्यंगस्नान
-अपक्ष उमेदवारी तरीही रॅलीची सुरवात काँग्रेस भवनातूनच; बागुलांच्या रॅलीला उत्फुर्त प्रतिसाद
-Assembly Election: पुण्यातील २१ मतदारसंघातील लढती, फक्त एका क्लिकवर..
-‘मावळ पॅटर्नचे परिणाम राज्यभरात भोगावे लागणार”; सुनील शेळकेंचा भाजपला इशारा