पुणे : सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे तर दुसरीकडे दिपावलीचा सण साजरा केला जात आहे. सर्व राजकीय उमेदवार, नेतेमंडळी नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांना दिपावलीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. आज नरक चतुर्दशीच्या निमित्ताने पर्वती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल यांनी रस्त्यावर फुगे विकणाऱ्या मुलांना अभ्यंगस्नान घातले.
आबा बागुल यांच्याकडून दरवर्षी रस्त्यावर राहणाऱ्या, फुगे विकणाऱ्या लहान मुलांना अभ्यंगस्नान घालत असतात. यंदा ऐन दिवाळी सणाच्या दिवसांतच विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. सर्व राजकीय पक्षांंकडून निवडणूक तयारी सुरु आहे. आबा बागुल हे देखील पर्वतीमधून निवडणूक लढत आहेत. निवडणुकीची धामधूम सुरु असूनही त्यांनी ही परंपरा जपली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आबा बागुल आणि त्यांच्या कुटुंबाकडून फूटपाथवर राहणाऱ्या, रस्त्यावर फुले, फुगे विकणाऱ्या मुलांना अभ्यंगस्नान घातले आहे. आबा बागुल आणि त्यांच्या पत्नी जयश्री बागुल यांनी सारसरबाग परिसरातील या मुलांना छान तेल-उटणे लावून औक्षण केले. मोती साबणाने अभ्यंगस्नान घातले. दरवर्षी आबा बागुल यांच्यामुळे या लहानग्यांची दिवाळी साजरी होत असते.
शाही अभ्यंगस्नानानंतर बागुल कुटुंबाकडून या मुलांना नवे कपडे, फराळ आणि फटाके अशा वस्तू दिल्या. या मेजवानीमुळे या मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आबा बागुल यांनी या मुलांच्या जीवनात सुखद क्षण आणल्याने मुलांच्या पालकांना अश्रू अनावर होताना देखील पहायला मिळते.
आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढण्यासाठी आघाडीतील नेत्यांकडे आग्रह धरला होता. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला. तरीही आबा बागुल यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी न करता पर्वतीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे निष्ठावंत आबा बागुल आता अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. आबा बागुल यांनी भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना आव्हन दिलं आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अपक्ष उमेदवारी तरीही रॅलीची सुरवात काँग्रेस भवनातूनच; बागुलांच्या रॅलीला उत्फुर्त प्रतिसाद
-Assembly Election: पुण्यातील २१ मतदारसंघातील लढती, फक्त एका क्लिकवर..
-‘मावळ पॅटर्नचे परिणाम राज्यभरात भोगावे लागणार”; सुनील शेळकेंचा भाजपला इशारा
-‘आरंभ है प्रचंड’: कोथरुडमध्ये भाजपची प्रचारात आघाडी; चंद्रकांत पाटलांचा ‘कोथरुड पॅटर्न’
-“मी साहेबांना दैवत मानलं, तरीही…”; शरद पवारांनी केलेल्या नकलेवर अजितदादांची प्रतिक्रिया