पुणे : राज्यात आज विधानसभा निवडणूक अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. आज अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचाराला सुरवात केली आहे. त्यातच सर्व जागांवर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी बंडाचं निशाण फडकवलं तर काहींनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. अशातच पुण्यातील पर्वती विधानसभा निवडणूक लढण्यासाठी माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे प्रचंड इच्छुक होते. त्यांना उमेदवारी न देता विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या नावाची घोषणा केली. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या भिमाले यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर श्रीनाथ भिमाले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये झालेली चर्चा आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शिष्टाईमुळे भिमाले यांनी अखेर माघार घेतली आहे. आज सकाळी मोहोळ येथे एक भिमाले यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले यावेळी दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. यानंतर पत्रकार परिषद घेत भीमाले यांनी आपला निर्णय जाहीर केला.
यावेळी बोलताना श्रीनाथ भिमाले म्हणाले की, “मी पर्वती मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. पण पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय दिलेला निर्णय मला मान्य आहे. तसेच माझ्या निर्णयाबाबत मी माझ्या कार्यकर्त्यांशी नागरिकांशी बातचीत केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की, ‘आपल्याला राज्यात महायुतीचं सरकार आणायचं आहे. भाजपचं काम करायचं आहे. त्यासाठी तुमचा मोठा भाऊ म्हणून मी स्वतः तुमच्या पाठीशी असणार आहे.’ मी माझ्या भावना व्यक्त केल्या आणि आपण सगळेजण एकत्र मिळून काम करू. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की, पुढच्या काळामध्ये आपण सर्व एकत्र काम करू.”
“गेली २७ वर्षे मी भाजपचं काम करत आहे. शेवटी नागरिकांच्या, कार्यकर्त्यांच्या भावना असतात, माझ्याही निवडणूक लढण्याच्या भावना आहेत. मला दु:ख होत होत तरीही मी पक्षाच्या विरोधात कोणताही निर्णय घेतला नाही. आणि विरोधात बोललोही नाही. त्यामुळे मला आता असं वाटतं की, राज्यात पुन्हा सत्ता आणण्यासाठी पुण्यातील ६ मतदारसंघात एकत्र काम केलं पाहिजे. पुण्यातील भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला विजय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे”, असं सांगत भिमाले यांनी आपली भूमिका मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मेट्रोने प्रवास करत हेमंत रासनेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कसब्यात दिसली महायुतीची एकजूट
-भाजपचे मुळीक गेले उमेदवारी अर्ज भरायला, फडणवीसांचा फोन आला अन् मुळीकांनी घेतला यु-टर्न
-काल अजितदादा रडले, अन् आज शरद पवारांनी केली नक्कल, रुमाल काढत पुसले डोळे