पुणे : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. या धामधुमीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अनेक मतदारसंघात उमेदवारीवरुन घमासान झाल्याचे पहायला मिळत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडखोरी, नाराजी दिसून येत आहे. अशातच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. या मतदारसंघावर भाजपने देखील दावा केला होता. वडगाव शेरी मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी भाजप आग्रही होता. मात्र, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आपला दावा करणं सोडलेलं नाही. ‘भाजपने या मतदारसंघात निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे’, असे भाजपचे माजी आमदार, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले होते. आता भाजपने जगदीश मुळीक यांना देखील पक्षांनी एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे आता वडगाव शेरीच्या राजकारणात वेगळा रंग आला आहे.
वडगाव शेरीचे विद्यमान उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे सुनील टिंगरे हे आहेत. सुनील टिंगरे यांचे नाव कल्याणीनगरच्या पोर्शे प्रकरणात आल्याने त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र टिंगरेंचं नाव दुसऱ्या उमेदवार यादीमध्ये जाहीर झाले.तरीही भाजपने मुळीकांना एबी फॉर्म दिला असून ते देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शंकर जगतापांची राहुल कलाटेंवर टीका; ‘शरद पवारांचा कार्यकर्ता जरी असता तरी…’
-बालवडकरांची तलवार म्यान! चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दिला अन् पेढाही भरवला
-हेमंत रासनेंकडून ‘घर चलो अभियाना’ने प्रचाराला सुरवात; थेट घेतायेत जनतेच्या भेटीगाठी