पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघातून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कन्हेरी या ठिकाणी त्यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी लोकसभेबाबत भाष्य करत “सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं चुकलं पण आता, शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना बारामतीमधून विधानसभेची उमेदवारी देऊन तात्याराव पवारांचं कुटुंब फोडलं नाही का?” असा उद्विग्न सवाल केला आहे. त्यांच्या या सवालावरुन आता त्यांचे सख्खे बंधू आणि युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले श्रीनिवास पवार?
“हा फार चुकीचा आणि दुर्दैवी आरोप आहे. मला दु:ख झालं ते वक्तव्य ऐकून. माझे वडील गेले तेव्हा मी १४ ते १५ वर्षांचा होतो. दादा १८ वर्षांचा होता. शरद पवारांना आम्ही तात्यासाहेबांच्या जागी पाहिलं. आताही बघतो, आणि बघत राहू. त्या शरद पवारांवर दादांनी गंभीर आरोप केला. यासारखं दुर्दैव नाही”, असे श्रीनिवास पवार म्हणाले आहेत.
‘भावनिक, भावनिक म्हणत अजितदादा का भावनिक झाले? आईला यामध्ये घ्यायलं नको होतं. तिचा राजकारणाशी संबंध नाही. उगातच घरातील लोकांना घेऊन, शेवटी म्हणायचं आमचं कुटुंब आहे. कुटूंबातील गोष्टी चार चौकटीत राहिल्या पाहिजे म्हणायचं पण, आपणं सगळं बोलून जायचं हे चुकीचं आहे’, असंही श्रीनिवास पवार म्हणाले आहेत.
“…आता नव्या पिढीला संधी द्यावी”
“जशी साहेबांनी ३० वर्ष बारामती सांभाळली, नंतर अजित पवारांना बारामती ३० वर्षे संभाळली, आता नवीन पिढीला संधी द्यावी. जसं दादा म्हणाले युगेंद्र पवारांनी माघार घ्यावी, तसं मी म्हणणार नाही. प्रत्येकाने आपापला विचार करावा. एकीकडे विकासाच्या मुद्द्यावरती बोलायचं आणि दुसरीकडे भावनिक करायचं. हे का करावं लागतं? तसेच कुटुंबाला मधे का आणलं जातं?” असा प्रश्न आता श्रीनिवास पाटलांकडून करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शंकर जगतापांची राहुल कलाटेंवर टीका; ‘शरद पवारांचा कार्यकर्ता जरी असता तरी…’
-बालवडकरांची तलवार म्यान! चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दिला अन् पेढाही भरवला
-हेमंत रासनेंकडून ‘घर चलो अभियाना’ने प्रचाराला सुरवात; थेट घेतायेत जनतेच्या भेटीगाठी
-‘मॉर्निंग वॉक विथ आबा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! तळजाई टेकडीवर आबा बागुल यांनी साधला मतदारांशी संवाद