पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी कसबा मतदारसंघातून काँग्रेसकडून विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे नाव जाहीर झाले आहे. रासने आणि धंगेकर यांच्यात पुन्हा एकदा कसब्यात सामना रंगत आहे. पोटनिवडणुकीत धंगेकरांनी विजय मिळवला होता, मात्र आताच्या निवडणुकीत माजी महापौर कमल व्यवहारे यांच्या बंडखोरीमुळे धंगेकरांची वाट बिकट होताना दिसत आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातून रविंद्र धंगेकरांसाठी डोकेदुखी वाढली असून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कमल व्यवहारे यांनी थेट बंडाचं निशाण फडकवत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कमल व्यवहारे यांना २००९ पासून विधानसभेची उमेदवारी नाकरण्यात येत असल्याने त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची डोकेदुखी वाढली आहे. १० वर्षात ५ पक्ष बदलून आलेली मंडळी पक्षापेक्षा स्वतःला मोठी समजू लागल्याचा फटका लोकसभेला बसला, आता त्यांना कसबा विधानसभेचे उमेदवारी देण्यात आली, असे म्हणत कमल व्यवहारे यांनी रवींद्र धंगेकर यांना टोला लगावला आहे.
तर दुसरीकडे पोटनिवडणुकीत झालेल्या परभवाचा वचपा काढण्यासाठी हेमंत रासने यांनी जोरदार तयारी केली आहे. या अनुषंगाने रासनेंनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. रस्त्यावर टेबल टाकून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे असो की आरोग्य शिबीर राबवणं, पुणेकरांसाठी ‘दस में बस’ची सुविधा अशा अनेक सुविधा नागरिकांना दिल्या आहेत. मतदारसंघातील अनेकांना मदतीला धावून जाणे, नागरिकांचे प्रश्न सोडवणे यामुळे हेमंत रासनेंचा मतदारसंघात चांगलाच बोलबाला सुरु आहे. त्यामुळे आता एकीकडे रासनेंची मतदारसंघातील चर्चा आणि दुसरीकडे कमल व्यवहारे यांंची बंडखोरी, अपक्ष उमेदवारी यामुळे धंगेकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बालवडकरांची तलवार म्यान! चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दिला अन् पेढाही भरवला
-हेमंत रासनेंकडून ‘घर चलो अभियाना’ने प्रचाराला सुरवात; थेट घेतायेत जनतेच्या भेटीगाठी
-‘मॉर्निंग वॉक विथ आबा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! तळजाई टेकडीवर आबा बागुल यांनी साधला मतदारांशी संवाद
-पाच हजार पुस्तके अन् लाखो वाचक! चंद्रकांत पाटलांच्या ‘फिरते वाचनालय’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद