पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि भाजपकडून कसबा निवडणुकीसाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत रासने यांनी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आहे. हेमंत रासने यांनी ग्रामदैवत कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दिवंगत गिरीश बापट आणि दिवंगत मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जात त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
हेमंत रासने यांनी मतदारसंघात ‘घर चलो अभियान’ सुरु केले आहे. या अभियानातून रासने थेट मतदारांशी संपर्क साधत आहेत. आज रासने यांनी प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांच्या भेटीगाठी घेत ख्याली-खुशाली जाणून घेतली. यावेळी रासने यांनी नागरिकांची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
जनतेच्या आशीर्वादाने कसबा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष – महायुतीच्या वतीने उमेदवारी जाहीर झाली. ज्यांच्या पाठिंबामुळे मी आजवर राजकीय क्षेत्रात पुढे जाऊ शकलो, त्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज “घर चलो अभियानाची’ उत्साहपूर्ण सुरुवात केली#Election2024 #BJP pic.twitter.com/HVPBlymFVu
— Hemant Rasane (@HemantNRasane) October 27, 2024
नागरिकांनी देखील रासने यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करत उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. यावेळी प्रभाग क्रमांक १५ चे अध्यक्ष सुनील रसाळ, उदय लेले, दीपक मारणे, उमेश मुळे, किरण जगदाळे, अभिजित सावंत, निलेश मेहंदळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘मॉर्निंग वॉक विथ आबा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! तळजाई टेकडीवर आबा बागुल यांनी साधला मतदारांशी संवाद
-पाच हजार पुस्तके अन् लाखो वाचक! चंद्रकांत पाटलांच्या ‘फिरते वाचनालय’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद
-सकल ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा, समाजाच्या पाठिंब्याने वाढले बळ
-पुण्यात रंगणार नव्या मैदानात जुन्या खेळाडूंचे सामने; कोण करणार कोणाला चितपट?