पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी रविवारी तळजाई टेकडी येथे मतदारांशी संवाद साधला. यावेळी आबा बागुल यांच्या ‘मॉर्निंग वॉक विथ आबा’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तळजाई टेकडी येथे क्रिकेट महर्षी सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम येथे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी संपूर्ण कुटुंबियांसह मित्रपरिवारासह नागरिकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे.
“आज लोकांनी माझ्या उपक्रमाचे स्वागत केले आणि तुम्हाला पक्षाने संधी दिली नाही म्हणून काय झाले? जनता आहे ना इथे. तुम्ही निर्धास्त रहा आणि लढा. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि राहणार आहोत”, नागरीकांच्या या शब्दांनी आबा बागुल यांना चांगलेच गहिवरुन आल्याचे पहायला मिळाले. ‘आता ही निवडणूक परिवर्तनाची आहे’ अशी ग्वाही देखील नागरिकांनी दिली यावेळी आबा बागुलांना निवडणुकीसाठी चांगलेच बळ मिळाले आहे.
माझी पहिली निवडणूक ही अपक्ष म्हणूनच होती.जनतेने मनावर घेतले तर काय होते,याचा दाखला तेंव्हा विजयाने मिळाला होता. याची आठवण नागरिकांनी करून दिली आणि यंदा पर्वतीमध्ये परिवर्तन घडणार आणि तुम्ही आमचे हक्काचे आमदार म्हणून निवडून येणारच. या मतदारांच्या भावना, त्यांचा ठाम विश्वास पाहता मला निवडणूक लढायला आणखी प्रोत्साहन, बळ मिळाले आहे’, असे आबा बागुल म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पाच हजार पुस्तके अन् लाखो वाचक! चंद्रकांत पाटलांच्या ‘फिरते वाचनालय’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद
-सकल ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा, समाजाच्या पाठिंब्याने वाढले बळ
-पुण्यात रंगणार नव्या मैदानात जुन्या खेळाडूंचे सामने; कोण करणार कोणाला चितपट?