पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाली असून राज्यभरात विविध ठिकाणी नाकाबंदी केल्याचे पहायला मिळत आहे. पुणे शहरातही अनेक भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदी दरम्यान संशयित गाड्यांची तपासणी केली जात आहे. २ दिवसांपूर्वी खेड शिवापूर भागात एका कारमधून ५ कोटींची रोकड सापडली. त्यानंतर आज शहरातील सहकारनगर भागामध्ये सोन्याने भरलेला टेम्पो सापडला आहे. तर मावळ येथील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारमध्ये १७ लाख ७५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
मावळ येथील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोलनाका येथे खोपोलीकडून पुण्याकडे जात असलेल्या मोटारीची तपासणी केली. त्यावेळी स्थिर सर्वेक्षण पथकाने कारमधून १७ लाख ७५ हजारांची रोकड सापडली. चालकाकडे चौकशी केली असता त्यांचा कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगितले. कारचालक पियुष जखोडीया (वय ३४) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तपास करताना पोलिसांना सापडलेल्या रकमेत तफावत आढळली त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम आता आयकर विभागाकडे सोपवण्यात आली आहे. आता पुण्यात अशा ३ घटना घडल्या आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागू असताना देखील हा पैसा नेमका येतोय कुठून, कोणासाठी आणि याचे मालक नेमके कोण? याची खुलासा लवकर व्हावा अशी अनेकांना अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बालेवाडीत ‘सुरसंध्या’ कार्यक्रम यंदा जोरात गाजणार, ‘𝑻𝒉𝒆 𝑭𝒐𝒍𝒌 आख्यान’, अभंग Repost’चे आयोजन
-अमित शहा याला दारात तरी उभं करतील का?; भरणेंच्या प्रचारसभेतून अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा
-पुण्यात ५ कोटींची रोकड अन् आता सोन्याने भरलेला ट्रक; १३८ कोटींचं सोनं नेमकं कोणाच्या मालकीचं?
-हडपसरमध्ये बाबरांचं बंडाचं निशाण; म्हणाले, “ज्यांना आपलं देणं घेणं नाही, त्यांचं मलाही…”