पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीनिमित्त भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर हे ‘लहू बालवडकर सोशल वेलफेअर’च्या माध्यमातून ‘सुरसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. यंदा ‘सुरसंध्या’ पर्वाचे चौथे वर्षे असून याही वर्षी श्रोत्यांना लोककलेच्या सुरांनी रंगलेली सांज अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन २७ ऑक्टोंबर व २८ ऑक्टोंबर अशा दोन दिवस ‘बाणेर’ येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लहू बालवडकर सोशल वेलफेअर’च्या माध्यमातून करण्यात आले आहे.
भाजपचे लहू बालवडकर गेल्या अनेक वर्षांपासून बालेवाडी बाणेर परिसरात सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्य करीत आहेत. यंदा सुरसंध्या या पर्वाचे चौथे वर्षे असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी ”𝑻𝒉𝒆 𝑭𝒐𝒍𝒌 आख्यान” या लोककलावंतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाची सुरूवात केंद्रीय राज्यमंत्री ‘मुरलीधर मोहोळ’ यांच्या शुभहस्ते होणार आहे. याचवेळी दहा वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत समाजकार्यात योगदान दिलेले पुण्याचे ‘राजेश पांडे’ यांची ‘महाराष्ट्र प्रदेश महामंत्री’पदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचा विशेष सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ ऑक्टोंबरला श्रोत्यांसाठी “अभंगाचे Modern कीर्तन” या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरूवात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ‘चंद्रकांत पाटील ‘ यांच्या हस्ते होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमाचे आयोजन मर्सिडीज शोरूम, पुणे-बंगलोर हायवे, बाणेर याठिकाणी करण्यात आले आहे. तर दोन्ही कार्यक्रमांची वेळ ही सायंकाळी सहा वाजता ठेवण्यात आली आहे. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे.
दरम्यान, मागच्या वर्षी सुरसंध्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक महान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार ‘महेश काळे’ यांच्या शास्त्री, सुगम व भावगीतांची सांयकाळची मैफल सजली होती. त्याआधी सुप्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी आणि गायिका आर्या आंबेकर यांच्या सुंदर मधूर आस्वाद ‘सुरसंध्या’ कार्यक्रमातून श्रोत्यांनी अनुभव घेतला आहे. त्यामुळे यंदाही या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अमित शहा याला दारात तरी उभं करतील का?; भरणेंच्या प्रचारसभेतून अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा
-पुण्यात ५ कोटींची रोकड अन् आता सोन्याने भरलेला ट्रक; १३८ कोटींचं सोनं नेमकं कोणाच्या मालकीचं?
-हडपसरमध्ये बाबरांचं बंडाचं निशाण; म्हणाले, “ज्यांना आपलं देणं घेणं नाही, त्यांचं मलाही…”