इंदापूर | पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर झाली. अनेक उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केले आहेत. अशातच सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी इंदापूर मतदारसंघात दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला सुरवात झाली असून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे. इंदापूरमधील कट्टर राजकीय विरोधक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे इंदापूच्या मैदानात आमनेसामने आले आहेत. त्यातच आता आज इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत अजित पवारांनी थेट हर्षवर्धन पाटीलांवर निशाणा साधल्याचे पहायला मिळाले आहे.
“मी जिल्हा सांभाळत होतो, सत्तेत असताना तुम्हाला फक्त इंदापूर सांभाळू शकला नाही. कर्मयोगी कारखाना जर दुसऱ्याच्या ताब्यात नाही गेला, तर त्या कारखान्याची वाटोळे आहे. त्यात, आपल्याला लक्ष घालावे लागेल. उजनीच्या बॅकवॉटरमध्ये एक मोठा प्रकल्प करतो आहे. मी तर कलेक्टरशी बोललोय, मी मंजूरही केले असून फक्त टेंडर काढायचं बाकी आहे, असे म्हणत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“इंदापूरला पाणी कुठून आणायचं कसं आणायचं त्याची जबाबदारी माझी. माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालंय. काँग्रेसवाल्यांनी जेवढी तरतूद केली नाही, तेवढी आम्ही अल्पसंख्याक लोकांसाठी तरतूद केलीय. लोकांच्या भुलथापांना बळी पडू नका, हे खोटं बोलतात महाराष्ट्रचं गुजरातला गेल्याचं सांगतात. पण, महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिला क्रमांकावर आहे. लाडकी बहीण योजना बंद केल्याचे सांगतात, पण तसा स्टे दाखवा. अमित शहा यांच्याकडे मी गेल्यावर काम होईल, का हा बाबा गेल्यावर काम होईल? अमित शहा यांच्याशी जवळीक जास्त आहेत. अमित शहा, याला दारात तरी उभं करतील का?” असा खोचक सवाल करत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ५ कोटींची रोकड अन् आता सोन्याने भरलेला ट्रक; १३८ कोटींचं सोनं नेमकं कोणाच्या मालकीचं?
-हडपसरमध्ये बाबरांचं बंडाचं निशाण; म्हणाले, “ज्यांना आपलं देणं घेणं नाही, त्यांचं मलाही…”