पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातून अनेक पक्षांकडून उेमदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. गुरुवारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर झाली. यामध्ये अनेक पुण्यातील बारामती, आंबेगाव, वडगाव शेरी आणि हडपसरमधून शरद पवारांनी अजित पवारांना तडगं आव्हान दिलं आहे.
सर्वात चर्चेचा आणि अजित पवार आमदार असलेल्या बारामती मतदारसंघातून त्यांना शरद पवारांकडून कोण आव्हान देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. बारामतीमधून अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हेच अजित पवारांना तडगं आव्हान देणार आहेत. बारामतीमध्ये काका-पुतण्या असा सामना रंगणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युगेंद्र पवार यांंनी प्रतिक्रिया देत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
“मला दिलेल्या संधीचं सोनं करीन, पवारसाहेबांना माझा अभिमान वाटेल, असं काम मी करेन. मुद्दे अनेक आहेत, बारामतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. २५ गावात प्यायला पाणी नाही, बेरोजगारीचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, शिक्षणात आपण जोर दिला पाहिजे. भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न मोठा आहे. बारामतीमध्ये स्थानिक पातळीवरील हा भ्रष्टाचार वाढलाय तो संपवायचा आहे”, असे म्हणत युगेंद्र पवारांनी काका अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीत काका-पुतण्या भिडणार
-२०१९ ला संधी हुकली पण शरद पवारांनी यंदा दिली ताकद, प्रशांत जगताप हडपसरच्या मैदानात
-Assembly Election: चिंचवडमध्ये जगतापांची प्रचाराला सुरवात; आघाडीतून कोण टक्कर देणार?