पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील पर्वती मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी उमेदवारी जाहीर झाली. आपल्या नावाची घोषणा होताच आमदार ‘माधुरी मिसाळ’ यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. यातच मतदारसंघातील प्रभागनिहाय तसेच सर्व शक्ती केंद्र प्रमुख आणि बुथ प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. अलिकडेच मतदारसंघातील 29, 30, आणि 31 प्रभागात त्यांनी आढावा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये त्यांनी निवडणुकीसाठी योजना आखण्यास सुरूवात केली आहे.
आपल्या पर्वती मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 29ची सर्व शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.
पर्वती मतदारसंघात गेल्या 15 वर्षात झालेला विकास प्रत्येक बूथ पर्यंत पोहोचावा तसेच महायुती सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांबाबत देखील प्रत्येक मतदारापर्यंत… pic.twitter.com/eko9IiSXVE
— Madhuri Misal (@madhurimisal) October 23, 2024
एकीकडे मिसाळांनी प्रचाराला सुरूवात केली असताना विरोधकांचा अद्यापही उमेदवार ठरलेला नाही. त्यामुळे मतदारसंघात सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३० मधील सर्वशक्ती केंद्रप्रमुख आणि बुथ प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पुणे शहराच्या विकासात आपल्या पर्वती मतदारसंघाचे योगदान, गेल्या 15 वर्षात मतदारसंघाचा झालेला कायापालट, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतलेले धाडसी निर्णय तसेच मतदार संघातील संघटन शक्ती या विषयांबाबत माधुरी मिसाळ यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक बूथपर्यंत प्रचार यंत्रणा राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पर्वती मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 30 ची सर्वशक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
पुणे शहराच्या विकासात आपल्या पर्वती मतदारसंघाचे योगदान, गेल्या 15 वर्षात मतदारसंघाचा झालेला कायापालट, केंद्र सरकार आणि राज्य… pic.twitter.com/wAh1qoMzsC
— Madhuri Misal (@madhurimisal) October 23, 2024
पर्वती मतदारसंघात गेल्या 15 वर्षात झालेला विकास प्रत्येक बूथपर्यंत पोहोचावा, तसेच महायुती सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांबाबत देखील प्रत्येक मतदारापर्यंत माहिती पोहोचावी. या पद्धतीने यंत्रणा राबवण्याच्या सूचना त्यांनी प्रभाक क्रमांक 29 च्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच विधानसभा निवडणूकीत भाजप-महायुती म्हणून प्रचार यंत्रणा कशा प्रकारे राबवणार? तसेच गेल्या 15 वर्षात केलेल्या कामांची माहिती देत सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवणे याबाबत त्यांनी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 34 च्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
दरम्यान, पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ या तब्बल 15 वर्षे आमदार राहिल्या आहेत. यंदा विजयाचा चौकार मारण्यासाठी त्यांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांनी आपल्या प्रचाराचा धडाका देखील सुरू केला आहे. मात्र महाविकास आघाडीत या जागेसंदर्भात पेच कायम राहिला आहे. अजूनही या मतदारसंघासाठी त्यांचा उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यामुळे यंदा या मतदारसंघात कोण बाजी मारणार ? त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पर्वती मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आबा बागुलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पक्ष कोणता?
-इंदापूरात तिहेरी लढत; हर्षवर्धन पाटलांचा उमेदवारी अर्ज भरला; भरणे, मानेंना देणार टक्कर
-मावळात राजकारण तापलं; भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक राजकीय उलथापालथ
-मावळात शेळकेंची डोकेदुखी वाढली; बापू भेगडे अपक्ष निवडणूक लढणार, बाळा भेगडेंचा पाठिंबा कोणाला?
-Ambegaon: ‘वळसे पाटलांमुळे माझं जगणं कठीण झालंय’ उमेदवारी अर्ज भरण्याआधी आंबेगावात राजकीय राडा