पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर झाले, उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यात आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटलांना उमेदवारी जाहीर झाली अन् अर्ज भरण्याआधीच राजकीय राडा पहायला मिळाला. आंबेगाव विधानसभा निवडणुकीसाठी मंत्री दिलीप वळसे पाटील हे आठव्यांदा अर्द भरणार आहेत. मात्र, अर्ज दाखल करण्या काही तासांपूर्वी शिंदे सेनेत फूट पडल्याचे दिसत आहे. वळसे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या आदिवासी विभागाचे प्रमुख विजय आडारी यांनी दिलीप वळसेंना विरोध दर्शवल्याचे पहायला मिळालं आहे.
‘मला पक्षाची बैठक असल्याचं सांगून बोलवलं, प्रत्यक्षात इथं दुसराच ठराव घेतला जात आहे. मुळातच मला हे मान्य नाही. वळसेंनी वेळोवेळी त्रास दिला. माझं जगणं त्यांच्यामुळं कठीण झालं आहे. त्यामुळं मी आणि माझे समर्थक वळसेंचा प्रचार करणार नाही. आम्ही आत्ताच्या आत्ता पक्षातून बाहेर पडत आहोत’, असे म्हणत आडारी यांनी पत्रकार परिषदेतून निघून गेल्याचे पहायला मिळाले.
सभापती निवडून आणताना आणि बाकी सर्व कामात त्यांना मदत केली, मात्र, बाकी आदीवासी भागात त्यांच्याकडून मला मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे. मी माझा जीव मुठीत धरून दिवस काढतोय, असे दिवस मी काढत आहे. फक्त मिटिंग आहे, असं सांगून बोलावलं गेलं. मात्र त्यांनी मला याबाबतची कोणतीही माहिती दिली नाही. मी जिल्ह्याचा आदीवासी प्रमुख म्हणून काम करतोय. मी आत्ता याक्षणी पक्ष सोडला आहे. मी पुढची भूमिका आत्ताच सांगणार नाही”, असे विजय आडारी म्हणाले आहेत. या राड्याचा वळसे पाटलांच्या मताधिक्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरेना! इच्छुकांचा जीव टांगणीला
-बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार; अजित दादांसमोर पुतण्याच थोपटणार दंड?
-दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील? इंदापूरात तिसऱ्यांदा होणार काँटे की टक्कर!
-राष्ट्रवादीने जाहीर केला हडपसरचा उमेदवार; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी? भानगिरे उद्या घेणार मेळावा
-Assembly Election: राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; टिंगरेंचा पत्ता कट? मुळीकांच्या आशा पल्लवीत