इंदापूर | पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून पहिल्या याद्या जाहीर झाल्या आहेत. भाजपकडून ९९, शिवसेनेकडून ४५ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज ३८ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांना देखील पुन्हा एकदा इंदापूरमधून लढण्याची संधी मिळाली आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील राजकीय वादामुळे इंदापूरचे राजकारण नेहमी चर्चेत राहिले आहे. त्यातच भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे समजताच हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे वळवला. काही दिवसांपूर्वीच इंदापूरमधून इच्छुक असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी उमेदवारीसाठी तुतारी फुंकली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला. हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देखील मिळण्याचे संकेत ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून देण्यात आले. त्यामुळे आता इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाली तर या मतदारसंघात पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे असा सामना रंगणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राष्ट्रवादीने जाहीर केला हडपसरचा उमेदवार; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी? भानगिरे उद्या घेणार मेळावा
-Assembly Election: राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; टिंगरेंचा पत्ता कट? मुळीकांच्या आशा पल्लवीत
-अजितदादांची राष्ट्रवादी तर सोडली, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणं उमेश पाटलांसाठी अडचणीच
-जगताप प्रचाराला लागले, तरीही महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना
-विधानसभा निवडणूक: 21 मतदारसंघांतून पहिल्याच दिवशी तब्बल 735 उमेदवारी अर्ज दाखल