पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये पुण्यातील जुन्नरमधून अतुल बेनके, बारामतीमधून अजित पवार, मावळमधून सुनील शेळके, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, खेड-आळंदीमधून दिलीप मोहिते, पिंपरीमधून अण्णा बनसोडे आणि हडपसरमधून चेतन तुपे या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असल्यामुळे अजित पवारांकडून तुपेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र हडपसर मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच तयारी केली होती. त्यातच भानगिरेंना उमेदवारी द्या, अशी मागणी करत हजारो कार्यकर्ते, नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले होते.
आज हडपसर विधानसभा मतदारसंघातून चेतन तुपे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेना शिंदे गटामध्ये नाराजी पसरली आहे. हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाने आपल्याकडे ठेवावा, यासाठी प्रमोद नाना भानगिरे हे आग्रही होते. मात्र आता हडपसरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यामुळे उद्या (गुरुवारी) मेळावा घेत नाना भानगरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election: राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; टिंगरेंचा पत्ता कट? मुळीकांच्या आशा पल्लवीत
-अजितदादांची राष्ट्रवादी तर सोडली, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणं उमेश पाटलांसाठी अडचणीच
-जगताप प्रचाराला लागले, तरीही महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना
-विधानसभा निवडणूक: 21 मतदारसंघांतून पहिल्याच दिवशी तब्बल 735 उमेदवारी अर्ज दाखल
-महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! चंद्रकांत पाटलांनी प्रचारही सुरू केला; उमेदवारी अर्जही दाखल करणार