पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आज निवडणुकीची अधिसूचना प्रसारित झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरवात झाली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर असणार आहे. आज पुणे जिल्ह्यात असणाऱ्या २१ विधानसभा मतदारसंघातून तब्बल ७३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.
२१ मतदारसंघापैकी सर्वाधिक उमेदवारी अर्ज हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दाखल करण्यात आले आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ३० उमेदवारांचे ५९ अर्ज दाखल झाले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे केवळ एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.
जुन्नर विधानसभा ९ उमेदवार २६ अर्ज
आंबेगाव विधानसभा ३० उमेदवार ५९ अर्ज
खेळ आळंदी विधानसभा १७ उमेदवार ४४ अर्ज
शिरूर विधानसभा २० उमेदवार ५५ अर्ज
दौंड विधानसभा २० उमेदवार ४० अर्ज
इंदापूर विधानसभा १३ उमेदवार ३३ अर्ज
बारामती विधानसभा एक उमेदवार एक अर्ज
पुरंदर विधानसभा १४ उमेदवार २९ अर्ज
भोर विधानसभा १० उमेदवार १७ अर्ज
मावळ विधानसभा ६ उमेदवार १५ अर्ज
चिंचवड विधानसभा १४ उमेदवार ३५ अर्ज
पिंपरी विधानसभा २९ उमेदवार ५९ अर्ज
भोसरी विधानसभा १४ उमेदवार २५ अर्ज
वडगाव शेरी विधानसभा २६ उमेदवार ४९ अर्ज
शिवाजीनगर विधानसभा १० उमेदवार २५ अर्ज
कोथरूड विधानसभा १२ उमेदवार २९ अर्ज
खडकवासल विधानसभा १९ उमेदवार ३५ अर्ज
पर्वती विधानसभा १९ उमेदवार ३५ अर्ज
हडपसर विधानसभा १९ उमेदवार ४६ अर्ज
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा १७ उमेदवार ५२ अर्ज
कसबा पेठ विधानसभा १६ उमेदवार २९ अर्ज
महत्वाच्या बातम्या-
-महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! चंद्रकांत पाटलांनी प्रचारही सुरू केला; उमेदवारी अर्जही दाखल करणार
-खेड-शिवापूरमध्ये सापडलेल्या पैशाबाबत रोहित पवारांचं वक्तव्य; “पहिली २५ कोटींची खेप पोहचली”
-कसब्यात धंगेकर अडचणीत? काँग्रेसमधील मुस्लिम नेत्याची आक्रमक भूमिका, थेट घेतली जरांगे पाटलांची भेट
-चंद्रकांत पाटलांचं ठरलं! कोथरुडकरांच्या साक्षीने २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज
-पिंपरी: नवनियुक्त शहराध्यक्षाच्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट; अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीला विरोध?