पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. कोथरुडमधून महायुतीचा उमेदवार जाहीर झाला, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख देखील फिक्स झाली तरीही अद्याप महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारीबाबत अद्याप कोणता निर्णय झालेला नाही. भाजपने उमेदवार निश्चित करून विधानसभा निवडणुकीत आघाडी घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघांतून भाजपने विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी देण्यात आली असून चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी प्रचाराचा नारळ देखील फोडला आहे. येत्या गुरुवारी २४ ऑक्टोबरला चंद्रकांत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा पहिला उमेदवारी अर्ज चंद्रकांत पाटलांकडूनच दाखल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे कोथरूडमधील महायुतीचा उमेदवार ठरला असून शक्तीप्रदर्शन, निवडणूक अर्ज भरण्याचे नियोजन देखील झाले. दुसरीकडे मात्र, महाविकास आघाडीकडून मतदारसंघ कोणाकडे जाणार याबाबतचा प्रश्न अद्याप सुटला नाही. हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला येणार असल्याचे सांगण्यात येत असला तरी अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.
महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे हा मतदारसंघ गेल्यास अंतर्गत गटबाजी पहायला मिळणार आहे. एकीकडी पृथ्वीराज सुतार यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत तर दुसरीकडे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडीमधून कोथरुडमध्ये बंडखोरी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे भाजपचा प्रचाराला सुरवात तर दुसरीकडे आघाडीच्या इच्छुकांमध्ये अद्यापही धाकधूक पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-खेड-शिवापूरमध्ये सापडलेल्या पैशाबाबत रोहित पवारांचं वक्तव्य; “पहिली २५ कोटींची खेप पोहचली”
-कसब्यात धंगेकर अडचणीत? काँग्रेसमधील मुस्लिम नेत्याची आक्रमक भूमिका, थेट घेतली जरांगे पाटलांची भेट
-चंद्रकांत पाटलांचं ठरलं! कोथरुडकरांच्या साक्षीने २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज
-पिंपरी: नवनियुक्त शहराध्यक्षाच्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट; अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीला विरोध?
-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी; रोज रात्री मद्यपींवर होणार कारवाई, आयुक्तांचे आदेश