पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आहेत तर दुसरीकडे आचारसंहितेचा भंग होताना दिसत आहे. खेड-शिवापूरमध्ये जप्त केलेली ५ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम घेऊन जाणाऱ्या गाडीमध्ये ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी एक जण सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा नातेवाईक आहे, तर एकाशी शहाजीबापू पाटलांचे चांगले संबंध असल्याचे समोर आले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“हे पैसे शहाजी पाटलांचे आहेत अशी चर्चा आहे आणि खेड-शिवापूरच्या डोंगरांमध्ये झाडांमध्ये ते पैसे पोलिसांना सापडलेले आहेत. एकच गाडी सापडलेत आणखी अशा पाच गाड्या होत्या, असा अंदाज आहे. २५ ते ३० कोटी रुपये होते लोकसभेमध्ये पैसा पाण्यासारखा वाटला. एकेका मतदारसंघांत महायुतीच्या नेत्यांनी शंभर-शंभर दीडशे कोटी रुपये तिथे वाटले. आता विधानसभेला महायुतीचे जे आमदार आहेत, ते कमीत कमी ५० कोटी रुपये तिथे खर्च केला जाईल अशी चर्चा आहे”, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे.
“आता मलिदा एवढा मोठ्या प्रमाणात महायुतीच्या नेत्यांनी खाल्ला आहे. त्यातून काही हिस्सा इलेक्शनमध्ये ते वाटणार आहेत. पण लोकसभेला कितीही पैसा वाटला तरी स्वाभिमानी लोकांनी तो पैसा न स्वीकारता लोकशाही स्वीकारली. आता या विधानसभा निवडणुकीमध्ये पहायला मिळेल की, महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येतील. हे पैसे वाटणारे, मलिदा खाणारे डोंगर आणि झाडी बघणारे जे सर्व महायुतीतले नेते आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला नक्कीच जातील, असं आम्हाला वाटतं”, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-कसब्यात धंगेकर अडचणीत? काँग्रेसमधील मुस्लिम नेत्याची आक्रमक भूमिका, थेट घेतली जरांगे पाटलांची भेट
-चंद्रकांत पाटलांचं ठरलं! कोथरुडकरांच्या साक्षीने २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज
-पिंपरी: नवनियुक्त शहराध्यक्षाच्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट; अण्णा बनसोडेंच्या उमेदवारीला विरोध?
-निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी; रोज रात्री मद्यपींवर होणार कारवाई, आयुक्तांचे आदेश
-चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग; राहुल कलाटेंनी घेतली राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भेट