पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिता लागू असताना देखील पुण्यात एका गाडीतून तब्बल ५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. खेड-शिवापूर येथे एका गाडीमधून ५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
आमचे कार्यकर्ते गेले म्हणून फक्त ५ कोटी तरी पकडले गेले. त्यावेळी घटनास्थळी आणखी १० कोटी रुपये होते, असा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवेसनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. या घटनेशी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांचा थेट संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. मात्र, याबाबत आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्यादरम्यान शिंदेंच्या अनेक आमदारांनी बंड केलं होतं. त्यातील एक म्हणजी शहाजी बापू पाटील. यांचं त्यावेळी एक वाक्य चांगलंच गाजलं होतं. ते म्हणजे ‘काय झाडी काय डोंगार’. शहाजीबापू पाटीलांची ऑडिओ क्लीप प्रचंड व्हायरल झाली. आता खेड शिवापूरमध्ये सापडलेल्या पैशांशी हा संबंध जोडण्यात आला. तर पैसे घेऊन जाणाऱ्या गाडीमध्ये सागर पाटील (सांगोला), रफीक नदाफ (सांगोला), बाळासाहेब असबे (सांगोला), शशिकांत कोळी (ड्रायव्हर) असे एकूण ४ व्यक्ती होते. त्यापैकी गुवाहाटीमधून ‘काय झाडी काय डोंगार’ हे ज्याच्यासोबत बोलत होते तोच रफीक नदाफ हा या गाडीमध्ये सापडला आहे. त्याच गाडीत असणारा सागर पाटील हा शहाजी बापूंचा नातेवाईक आहे. या चार व्यक्तींची नावे खेड शिवापूर पोलीस चौकीच्या स्टेशन डायरीमधे नोंद करण्यात आली आहेत, अशी माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: बागवे खरंच भाजपच्या वाटेवर आहेत? व्हिडीओ शेअर करत थेट सांगितलं…
-अजित पवारांची सर्जिकल स्ट्राईक; उमेदवार यादीपूर्वीच वाटले एबी फॉर्मस्, पुण्यातून कोणाला संंधी?
-Assembly Election: अजितदादांचं ठरलं! येत्या २८ तारखेला कन्हेरीत फुटणार प्रचाराचा नारळ
-भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही; बाळा भेगडे, भीमराव तापकीर ‘सागर’ बंगल्यावर